You can access the distribution details by navigating to My Print Books(POD) > Distribution
श्रीमद्भगवद्गीता (किंवा नुसतीच गीता) म्हणजे भारतीय शास्त्रग्रंथांमधील एक सर्वात पूजनीय व सन्मान्य असा ग्रंथ आहे, ज्यात भारतीय सनातन आध्यात्मिक परंपरेचे सर्वोच्च तत्त्वज्ञान सर्वंकषपणे मांडलेले आहे. असे मानले जाते की गीता ही प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला कुरुक्षेत्रावर महाभारत युद्धाआधी सांगितली. कौरव व पांडवांमधील युद्ध सुरु होणार असतांनाच, अचानक अर्जुनाला मोहाने ग्रासले व कौरवसैन्यातील आपल्याच वडीलधारी माणसांना, गुरुजनांना, इतर आप्तवकीयांना आपण मारायला निघालो आहोत हे योग्य नव्हे असे त्याला वाटले. त्यामुळे त्याने आपली शस्त्रे खाली ठेवली आणि अत्यंत विषादपूर्ण अवस्थेत तो रथात खाली बसला. त्याने श्रीकृष्णांना आपल्या स्थितीचे समर्थन देण्याचा प्रयत्न केला, पण श्रीकृष्णांना ते अजिबात पटले नव्हते, हे जेव्हां अर्जुनाच्या लक्षात आले, तेव्हां त्याने श्रीकृष्णांना विनंति केली की त्यांनीच मित्र व हितचिंतक या नात्याने अर्जुनाला मार्ग दाखवावा. श्रीकृष्णांनी प्रथम थोडक्यात सनातन तत्त्वज्ञान समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण तरी अर्जुनाचे मन वळत नव्हते हे पाहून मग श्रीकृष्णांनी सविस्तरपणे सर्व गूढ आध्यात्मिक तत्त्वज्ञान उपनिषदांच्या साररूपात अर्जुनापुढे उकलले, जे श्रीमद्भगवद्गीता म्हणून सर्वच जगाला...
Currently there are no reviews available for this book.
Be the first one to write a review for the book श्रीमद्भगवद्गीता जशी मला समजली.