You can access the distribution details by navigating to My Print Books(POD) > Distribution
मी एक सर्वसाधारण मुमुक्षु आहे आणि माझे अध्यात्माचे आकलन इतरांपर्यंत पोहचवावे या उद्देशाने मी हे पुस्तक प्रसिद्ध करण्याचे ठरविले. हे पुस्तक माझ्या ब्लॉग्जवर आणि माझ्या लेखांवर आधारित असून ते दोन भागात विभागलेले आहे. पहिल्या भागात आध्यात्मिक संकल्पना आहेत, तर दुसर्याित आध्यात्मिक ध्येय काय असावे आणि ते प्राप्त करण्यासाठी काय करावे यासंबंधातील माझे विचार मांडलेले आहेत. मी या पुस्तकात आध्यात्मिक ग्रंथांमधून थेट कांहीही उद्धृत करणे शक्यतोवर टाळले आहे आणि त्याऐवजी मला त्यातून काय कळले, ते साराच्या स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. यात मी कांही तरी "सिद्ध करण्यासाठी" दुसरे कांही तरी क्लिष्ट तत्त्व मांडणे वगैरे कांही केलेले नाही. त्यामुळेच हे पुस्तक वाचनीय व उपयुक्त देखील व्हावे असा मला विश्वास आहे.
शक्यतोवर माझे विचार मी व्यावहारिक जीवनाच्या संदर्भात मांडले आहेत. मी या पुस्तकात कित्येक गोष्टी आणि संवाद यांचा अंतर्भाव केला आहे. जरी ते काल्पनिक असले, तरी त्यातून आध्यात्मिक संकल्पना स्पष्ट होण्यास मदत होते असा माझा विश्वास आहे. तसेच त्यामुळे पुस्तक वाचनीय होण्यास देखील मदत होते, कारण अन्यथा अध्यात्मासारखा विषय खूपच बोजड आणि नीरस वाटू शकतो.
माझा असा विश्वास आहे की हे पुस्तक सोप्या भाषेत आणि माझ्यासारख्या एका सर्वसाधारण साधकाने लिहिलेले असल्यामुळे ते अध्यात्ममार्गात नुकताच रस निर्माण झालेल्या कोणाही साधकाला सहजपणे वाचता येईल व समजेल. अध्यात्ममार्गावर प्रगति झालेल्या मुमुक्षूंना सुद्धा या पुस्तकाचा उपयोग मनन व चिंतनासाठी होऊ शकेल, कारण अध्यात्म म्हणजे या ऐहिक जगाच्या पलिकडे काय आहे याचा सातत्याने विचार करत राहून मनाचे संपूर्ण परिवर्तन घडवून आणणे होय.
Currently there are no reviews available for this book.
Be the first one to write a review for the book हे जग गंभीरपणे घेऊ नका! - भाग १.