You can access the distribution details by navigating to My Print Books(POD) > Distribution
आंतरजालावर फेसबूक, मायबोली, मिसळपाव, मराठी साहित्य समुह इत्यादी संकेतस्थळांवर मुशाफिरी करतांना लिहिलेले हे लेख. औरंगाबाद, नांदेड इथल्या शासकिय वैद्यकिय महाविद्यालायात आणि पैठण इथल्या ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्रात अध्यापक आणि डॉक्टर म्हणून काम करत असतांना आलेले काही अनुभव मी शब्दबद्ध केले आहेत. हे माझे अनुभव असल्यानं त्यात वारंवार "मी" डोकावणारच ! यात आलेल्या व्यक्ती रुग्ण, माझे विद्यार्थी किंवा सहकारी आहेत. त्यांचा नामोल्लेख मी मुद्दामच टाळला आहे. या अनुभवांनी मराठी साहित्यात क्रांती घडून येईल असा माझा दावा नाही. या पुस्तकातील एका लेखाचं शीर्षक "खारीचं योगदान" असं आहे. हे पुस्तक असंच "खारीचं योगदान" समजावं इतकीच माझी नम्र विनंती आहे.
Currently there are no reviews available for this book.
Be the first one to write a review for the book खारीचं योगदान.