Description
हे पुस्तक मी "जीविधा" या जैववैविध्य अभ्यास सहली नेणाऱ्या संस्थेबरोबर ८ ते १३ मार्च २०२२ दरम्यान केलेल्या चोपता व्हॅली, तुंगनाथ, हरिद्वार, ऋषिकेश, राजाजी टायगर रिझर्व्ह या ठिकाणांना दिलेल्या भेटीबद्दल विस्तृत वर्णन आहे.
ह्या अविस्मरणीय अनुभवाबद्दल ज्यांनी ही टूर यशस्वी केली ते श्री राजीव पंडित (संस्थापक आणि संचालक, जीविधा) आणि ज्यांच्यामुळे मला ह्या टूरबद्दल कळलं ते माझे ज्येष्ठ मित्र श्री सुधीर खेडकर, या दोघांचे मी मनःपूर्वक आभार मानतो.
नितीन हे एक ऑटोमोबाईल्समध्ये रस असणारे मेकॅनिकल इंजिनियर आणि एम.बी.ए. आहेत. ऑटोमोटिव्ह उद्योगात प्रामुख्यानं आर.अँड डी., मार्केट रिसर्च, प्रोजेक्ट आणि प्रॉडक्ट मॅनेजमेंट या क्षेत्रांत टाटा मोटर्स आणि महिंद्रासारख्या कॉर्पोरेट्समध्ये २५ वर्षांहून अधिक काळ व्यतीत केल्यानंतर त्यांनी उत्पादन निर्मितीच्या कलेत प्रावीण्य मिळवलेलं आहे.
स्वतंत्रपणे काम करण्याची इच्छा आणि मिळवलेलं ज्ञान इतरांना वाटण्याची आवड या उद्देशांनी त्यांनी २०१८ साली क्वांटम लीप कन्सल्टंट्स
(www.quantumleapconsultants.in) ही स्वत:ची सल्लागार कंपनी (कन्सल्टिंग फर्म) सुरू केली.
ही त्यांची व्यावसायिक बाजू आहे तर वैयक्तिक पातळीवर त्यांना गिर्यारोहण , प्रवास , छायाचित्रण, पक्षी निरीक्षण , बागकाम, गायन, संगीत ऐकणं , क्रिकेट आणि चित्रपट पाहणं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पुस्तक वाचन आणि लेखन हे छंद आहेत.
ते प्रामुख्यानं प्रेरणादायी व्यक्तिमत्वं, चित्रपट समीक्षा, प्रवासवर्णन, ऐतिहासिक घटना याबद्दल लिहितात. ते त्यांची आई शैला, पत्नी सौ.संपदा (ज्या शिक्षिका आहेत) आणि मुलगा आदित्य यांच्यासोबत पुण्यात राहतात.
नियतकालिकांमध्ये लेख लिहिण्याची, विविध तंत्रज्ञान विषयक मंचांवर बोलण्याची आणि मॉडरेट करण्याची त्यांना आवड आहे जिथे ते आपला अनुभव आणि ज्ञान, उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्राबरोबर सामायिक करतात.
फेसबुक पेज:
(https://www.facebook.com/EXCELerator-724812131219488)
लिंक्डइन प्रोफाइल:
(https://www.linkedin.com/in/nitin-shrotri-cpm-pmp-1b77617/detail/recent-activity/posts/)
त्यांचा असा विश्वास आहे की एखाद्या उत्पादनाप्रमाणं प्रत्येक व्यक्ती एक वेगळेपण / अद्वितीय मूल्य प्रस्ताव (युनिक सेलिंग प्रपोझिशन) प्रस्थापित करू शकते आणि असं करणं अत्यावश्यक आहे.
एखाद्याच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये कौशल्यं विकसित करून अशी मूल्यं विकसित केली जाऊ शकतात.
भारतीय संस्कृती आणि मूल्यं यांच्यावर त्यांचा गाढ विश्वास असून ते स्वतः श्रीमद्भागवत आणि श्रीमदभगवद्गीता यांचं मनापासून अनुसरण करतात.
Publisher: नितीन श्रोत्री
Number of Pages: 78
Dimensions: 5.5"x8.5"
Interior Pages: B&W
Binding:
Paperback (Perfect Binding)
Availability:
In Stock (Print on Demand)