You can access the distribution details by navigating to My Print Books(POD) > Distribution
प्रत्येक माणसाच्या आयुष्यात एक रणांगण असतं. काही जण बाहेरच्या जगाशी झगडतात, काही जण परिस्थितीशी, पण सर्वात मोठं युद्ध हे स्वतःशीचं असतं. आपल्या भीती, शंका-कुशंका, आळस, अपयश, निराशा आणि नकारात्मक विचारांशी दररोज आपण लढत असतो. बाहेरचा शत्रू दिसतो, त्याच्याशी सामना करणं शक्य असतं, पण आतला शत्रू अदृश्य असतो. तो आपल्या विचारांत, सवयींमध्ये आणि कृतींमध्ये दडलेला असतो. म्हणूनच जग जिंकणं कदाचित सोपं असू शकेल, पण स्वतःवर विजय मिळवणं ही खरी ताकद आहे.
"एक युद्ध स्वतःशी” हे पुस्तक लिहिण्यामागचं कारण म्हणजे मला ठाम विश्वास आहे की प्रत्येक माणसात अमर्याद शक्ती आहे. पण ती शक्ती उलगडण्यासाठी सर्वप्रथम स्वतःशी जिंकणं आवश्यक आहे. हे युद्ध एकदाच होत नाही; ते प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षणी सुरू असतं. सकाळी उठायचं की अजून झोपायचं, ध्येयाकडे पाऊल टाकायचं की टाळाटाळ करायची, सकारात्मक विचार करायचा की नकारात्मकतेला बळी पडायचं – प्रत्येक निर्णय हा या युद्धाचा एक वार असतो.
Currently there are no reviews available for this book.
Be the first one to write a review for the book एक युद्ध स्वतःशी.