You can access the distribution details by navigating to My Print Books(POD) > Distribution
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांत रमणारा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या रांगड्या किल्ल्यांची आवड असलेला, अमेरिकेत राहूनही महाराष्ट्रभूमीच्या आराध्य दैवतांना पुजणारा, निसर्गवेडा माणूस. लहानपणापासूनच त्याने गिर्यारोहणाचा छंद जोपासला. आयुष्यातील काही घडामोडींनी त्याच्या सुप्त स्वप्नाला चालना मिळाली आणि एक साहसी संकल्प उदयास आला. कळसुबाई अधिक उंचीवर ज्या पर्वताचा पायथा आहे, असा जगातील सर्वात उंच "फ्री-स्टँडिंग" पर्वत किलीमंजारो चढण्याचा तो संकल्प.
१९,३४१ फूट उंचीवर असलेलं किलीमंजारोचं शिखर पादाक्रांत करण्यासाठी त्याने कशी तयारी केली? त्यात काय अडचणी आल्या? अत्यंत प्रतिकूल हवामानात विरळ हवेशी जुळवून घेत, सात दिवसांच्या मोहिमेत त्याला काय अनुभव आले? त्याची मोहीम यशस्वी झाली का?
अतिशय प्रेरणादायी आणि मनाला खिळवून टाकणारं हे प्रवास-वर्णन वाचताना आफ्रिकन सफारीतील मजेदार किस्से, किलीमंजारोवरील अवर्णनीय देखावे आणि मोहिमेदरम्यान आलेले रोमांचक अनुभव एकेक करून उलगडत जातात. विविध पैलू असलेला हा ध्येयवेडा गिर्यारोहक, या पुस्तकाच्या माध्यमातून लेखकाच्या भूमिकेत आपल्यासमोर येत आहे. त्याच्या ओघवत्या लेखनशैलीमुळे आपणही किलीमंजारो सर करत आहोत याची अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही. चला तर मग, चित्तथरारक आफ्रिकन सफारी आणि किलीमंजारोच्या सफरीला!
Currently there are no reviews available for this book.
Be the first one to write a review for the book चित्तथरारक किलीमंजारो आणि आफ्रिकन सफारी.