You can access the distribution details by navigating to My Print Books(POD) > Distribution
प्रत्येक घराण्याला इतिहास हा असतोच. जरुरी नाही की प्रत्येक घरी शिवाजीनेच जन्म घ्यावा. माता जिजाऊच असावी. पण प्रत्येक घराचा इतिहास, त्यांच्या परंपरा आणि त्यावेळेनुसार त्यांनी घेतलेले निर्णय,त्यांचे गुणवैशिष्ट्ये ही त्यांच्या वंशजांसाठी एक आदर्श ठरू शकतात.
समयोचित दृढआत्मविश्वासाने योग्य निर्णय घेण्यासाठी मार्गदर्शक ठरू शकतात. थोडक्यात आपले पूर्वज आपला दीपस्तंभ म्हणून दिशादर्शक ठरतात.
शिवाय या लेखनात मी समयोचित काही मराठी म्हणींनाही स्थान दिले आहे. कारण पूर्वीच्या लोकांची ही रोजच्या सहज बोलण्यात समयोचित म्हणी वापरण्याची एक कला होती. जी आजकाल आपल्याला विशेष आढळत नाही. त्यामुळे त्या म्हणी लोप पावत आहेत. मी मात्र या म्हणींना यथोचित मानाचे स्थान देण्याचा प्रयत्न केला आहे. त्या वाचकाच्या लक्षात याव्यात म्हणून त्यांना ठळक केले आहे, हे वाचतांना लक्षात येईलच.
शेवटी ‘जानकी’ म्हणजे माझी आजी व ‘लक्ष्मी’ अर्थात माझी आई हिच्यासंबंधीचे लेखन,तिच्या स्वत:च्या भावना आहेत. माझ्या आईच्या बाबतीतले लेखन हे मी प्रत्यक्ष तिच्याकडून ऐकलेले आहे. तिच्या आयुष्यातील अनुभवांच्या अनेक गोष्टींचे आम्हीही साक्षीदार आहोत. खरे तर तिच्या आयुष्यातील असे अनेक प्रसंग आहेत की त्यात ती खूप होरपळून निघाली. त्या प्रत्येक गोष्टी आम्हीही जवळून बघितल्या आहेत. तिच्या माझ्याकडील दहा वर्षांच्या वास्तव्यास तिने सहज तिचे मन अनेकदा माझ्याजवळ मोकळे केले. सर्वच विस्ताराने लिहिले तर या गोष्टींचा खूप विस्तार होईल. फक्त नेमके तेवढेच लिहिण्याचा मी इथे प्रयत्न केला आहे. ती जरी माझ्याकडे दहा वर्षे होती तरी तिचे देहावसान माझ्या मोठ्या बहिणीकडे झाले. त्यावेळी तिच्याजवळ मी नव्हते. अनेक वर्षे आम्ही एकमेकींच्या सहवासात होतो. मी सगळ्यात धाकटी म्हणून व माझी मोठी बहीण वसुंधरा अशा आम्हा दोघींवर तिचे विशेष प्रेम होते. तिच्या अतिशय वाईट काळात आम्ही तिच्यासोबत नेहमीच होतो. कदाचित हेही त्यामागचे कारण असावे. मी सगळ्यात लहान म्हणून तिचे माझ्यावर अतिशय प्रेम होते. त्याबाबतीत मी फार भाग्यवान होते. शिवाय तिचे प्रत्येक म्हणणे मी ऐकत असे. हे देखील तिच्या मनासारखे होते. पण तरीही तिच्या शेवटच्या वेळी तिची माझी भेट होऊ शकली नाही,हे दु:ख तिच्याईतके मलाही कायम शल्य होऊन टोचत राहीले. निमित्यमात्र कोणीही असोत पण शेवटी हे योग असतात. ते आपण निमुटपणे मान्य करावे हेच योग्य.‘बायोस्कोप’ प्रवास आठवणींचा या पुस्तकाची सुधारित आवृत्ती२ ही वाचकांच्या पसंतीस नक्कीच उतरेल याची मला पूर्ण मला खात्री आहे.कारण यातील मुख्य दोन नायिका म्हणजे ‘जानकी’ व ‘लक्ष्मी’ यांचा समावेश हे या नवीन सुधारित आवृत्तीचे मुख्य लक्षवेधी आकर्षण आहे.
Currently there are no reviews available for this book.
Be the first one to write a review for the book बायोस्कोप प्रवास आठवणींचा.