You can access the distribution details by navigating to My pre-printed books > Distribution
आधुनीक बोध कथा
माझ्या लहानपणी ईसापनितीच्या कथा फार प्रसिद्ध होत्या. या छोट्या छोट्या कथा आयुष्यातील काही महत्वाची प्रिन्सिपल्स सहज शिकवून जायच्या. या कथांचे नाव ईसापनिती असेच होते. ईसाप नावाचा हा माणूस प्रत्यक्षात गुलाम होता म्हणे. आपल्या मालकाच्या मुलांचे मनोरंजन करण्यासाठी तो या कथा रचून सांगत असे. बहुतेक कथा या प्राणी आणि पक्षांबद्दल असत. या कथा त्यावेळी अत्यंत लोकप्रीय झाल्या होत्या.
अशाच दुसर्याा लोकप्रीय झालेल्या कथा म्हणजे ‘पंचतंत्र’ या कथा. या कथा पण प्राणी आणि पक्षी यांबद्दलच असायच्या. या कथा पण आयुष्यातील काही महत्वाची ‘तत्वे’ शिकवून जायच्या. थोडक्यात या कथांमधून काहीतरी शिकायला मिळायचे.
ज्या कथांमधून किंवा गोष्टींमधून काहीतरी शिकायला मिळते त्यांना ‘बोध कथा’ असे म्हणतात. या कथा जशा प्राचीन काळात सांगीतल्या जात होत्या तशाच त्या हल्लीच्या म्हणजे आधुनीक काळात पण सांगीतल्या जातात. या कथांमधुनही बरेच काही शिकता येते. माझ्या हातुन अशा काही कथांचे लिखाण झाले असल्याचे माझ्या लक्षात आले आहे. अर्थात माझे लिखाण हे माझे स्वतःचे तसेच इतरांच्या अनुभवावर आधारलेले आहे. यातील बहुतेक कथा फेसबूकवर पोस्ट केलेल्या आहेत. यातील काही कथांना तर प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. काही कथा तर व्हॉट्सअपवर व्हायरल पण झाल्या आहेत. मला अनेक ठिकाणाहुन या कथा आवडल्याचे फोन, मेसेजेस आणि व्हॉट्सअप मेसेजेस येत असतात.
असे हे लेख एकत्र करून ते पुस्तक रुपाने प्रसिद्ध केल्यास ते वाचकांना आवडेल असे वाटल्यामूळे हा प्रपंच. माझा हा प्रयत्न यशस्वी करायचा की नाही हे वाचकांनीच ठरवायचे.
Currently there are no reviews available for this book.
Be the first one to write a review for the book आधुनिक बोधकथा.