You can access the distribution details by navigating to My pre-printed books > Distribution
सदर पुस्तिकेत अंबाजोगाई परिसरात आढळणाऱ्या १७४ पक्ष्यांची शक्यतो गण व कुलानुसार माहिती दिली आहे. आपल्याकडे भारतात ज्या २१ गणांचे पक्षी आढळतात. अंबाजोगाईच्या १५ ते २० किमी. च्या परिघात त्यापैकी १७ गणांतील पक्षी आतापर्यंत सापडले आहेत.
पक्षी व पर्यावरण - परस्परसंबंध पक्षी हा मानवाप्रमाणेच एक सामाजिक जीव आहे. उत्क्रांतीचे विविध टप्पे अभ्यासले तर असे निदर्शनास येते की जलचरांपासून उभयचर व उभयचरांपासून पक्षी उत्क्रांत झाले. उत्क्रांतीचा हा टप्पा सर्वार्थाने सर्वात महत्वाचा मानला जातो. सजीवांच्या रक्ताभिसरण, उत्सर्जन व चेतासंस्थेत ह्या टप्प्यात खुप मोठया प्रमाणात बदल घडले आहेत. म्हणूनच पक्षी हे पर्यावरणातील अतिशय महत्वाचा दुवा देरवील आहेत.
पक्षी हा अन्नसारवळीतला एक मोठा दुवा आहे. पक्ष्यांचे अन्न म्हणजे सरपटणारे प्राणी, हवेतील किडे, पिकांवरील किडे व किटक होय. पक्षी जर नसते तर टोळधाड, उंदीर, किडे, सरपटणाऱ्या प्राण्यांची संख्या प्रचंड वाढली असती. या सर्वांपासून पक्षी शेतीचे संरक्षण करतात व पर्यायाने शेतकऱ्यांची मदत करतात.
___ अनेक प्रकारच्या वनस्पतींचे परागीकरण पक्ष्यांमुळे घडते. गहू, ज्वारी, मका या धान्यावर बसणाऱ्या चिमणी, सुगरण, गप्पीदास अशा पक्ष्यांच्या पायाला परागकण चिटकून परागीकरण होते व त्यामुळेच कणसे भरून येतात. अशा रितीने ते पुनश्च शेतकऱ्यांच्या मित्राची भुमिका निभावतात.
मोठया वृक्षांची फळे पक्षी खातात व त्यांच्या विष्ठेद्वारे या वृक्षांच्या बिया वनात पडतात. पक्ष्यांची विष्ठा ही रखतासाररवी काम करते व बिया लवकर रुजतात. अशा रितीने पक्षी नैसर्गिक वनीकरणाची जबाबदारी पार पाडतात.
पक्षी सफाई कामगार म्हणून सतत कार्यरत असतात. गिधाड, घार, कावळे हे पक्षी मेलेल्या प्राण्यांचे मांस खातात. साळूका, कबुतर, बुलबुल हे पक्षी खरकटे अन्न खातात व स्वच्छता अभियानास हातभार लावतात. बगळे, कोतवाल हे पक्षी प्राण्यांच्या अंगावरील किडे खातात व प्राण्यांचे आरोग्य उत्तम राहावे यासाठी त्यांची मदत होते.
आपण कधी निराश झालो अन् पक्ष्यांची किलबिल कानी पडली तर हळूहळू ती निराशा कधी अन् कशी दूर झाली हेच कळत नाही. निसर्गातील पक्ष्यांची अप्रतिम रंगसंगती कायमच सुरवावह असते. माणसाचे मन:स्वास्थ्य निरोगी राखण्यास देखील पक्षी नेहमीच हातभार लावतात.
खरंतर पक्षी व पर्यावरण हे परस्परपुरकच असतात. पण मानवाने स्वत:च्या सुरवासाठी व सोयीसाठी जे नवनविन शोध लावले आहेत, उद्योगधंदे उभारले आहेत यातून वसुंधरेचा समतोल बिघडेल अशी भीती आज शास्त्रज्ञांना वाटू लागली आहे. दिवसेंदिवस वाढत जाणारे पृथ्वीचे तापमान, जैविक साधनसंपत्तीचा -हास अशा समस्यांना सामोरे जावे लागत आहे. आपण पक्ष्यांना आपले मित्र बनवून व आपण त्यांचे मित्र बनून हा हास रोखण्यास हातभार लावू या.
Currently there are no reviews available for this book.
Be the first one to write a review for the book भोवताल.