You can access the distribution details by navigating to My pre-printed books > Distribution
जवळपास ८०% समस्या या आर्थिक अडचणी व ढिसाळ अर्थ नियोजनामुळे ओढवलेल्या आहेत असे एका सर्वेक्षणावरून लक्षात आले आहे. यापुढे सरकारी नोकऱ्या कमी होत जाणार व पेन्शन तुमच्या दिमतीला नसणार आणि महागाई वाढणे कुणासाठी थांबणार नाही. तेव्हा मग हे सर्व असताना आपण आपले अर्थ नियोजन का करू नये ? अर्थ नियोजनाबद्दल व विविध गुंतवणूक पर्यायांबद्दल का समजून घेऊ नये ? आणि शेअर मार्केट सारखा प्रचंड ताकद असलेला पर्याय व त्यातील खाचखळगे समजून त्याचा फायदा का घेऊ नये? शेअर मार्केट हे कायदेशीररित्या मान्यताप्राप्त आहे. जसे विमा क्षेत्र हे इन्शुरन्स नियामक विकास प्राधिकरण (इर्डा - IRDA) नियंत्रित आहे तसेच हे क्षेत्र सेबी (SEBI) द्वारे नियंत्रित आहे. शेअर मार्केट ची ताकद अर्थात परतावा हा हत्ती सारखा आहे. ती ताकद आपण समजून न घेता जर गुंतवणूक केली तर आपण त्याचेकडून गध्या एवढ्याच परताव्याची अपेक्षा ठेवतो आणि त्यातही बकरी एवढा परतावा मिळाला की त्यातून बाहेर पडतो. आणि जर तोटा झालाच तर त्याचा नाद सोडतो.
या सर्वाला सुरुवात करायला “अर्थ नियोजन व गुंतवणूक” हे पुस्तक आपल्याला नक्कीच मदत करेल. जे आधीपासून अर्थ नियोजन व गुंतवणूक करतात त्यांनाही यातून काही गोष्टींचा उजाळा होईल तर काही नवीन शिकायला मिळेल. तुम्ही तुमची धोरणे ठरविली असतील तर त्यांचे पुनरावलोकन करायला यातून काहीतरी मिळेल , धोरणे नसतील तर ते तयार करायला प्रेरणा मिळेल. समजून उमजून व स्वतःला त्यासाठी तयार न करता गुंतवणुकीला सामोरे जाणे म्हणजे जुगारच ठरेल आणि आपल्या पदरी यश कमी आणि अपयशच जास्त वेळा पडण्याची दाट शक्यता आहे. गुंतवणूक व त्यातही शेअर बाजारातील गुंतवणूक ही एक कला, विज्ञान व वाणिज्य याचे मिश्रण आहे. हे पुस्तक तुम्हाला ते प्राथमिक स्तराला समजून घेण्यास व तुमच्यात अभ्यासपूर्ण विश्वास निर्माण करण्याला नक्कीच सहाय्यक ठरेल असा मला विश्वास आहे. ही तुमची सुरुवात असेल, यात जसजसे तुम्ही शिकण्याची वृत्ती जोपासत प्रवास सुरू कराल तश्या तुमच्या क्षमता वाढत जाईल व तुम्हाला या वेगळ्या शक्तिशाली जगाचा उलगडा व फायदा होत जाईल. तो तुम्ही स्वतःच्या, कुटुंबाच्या तसेच काही समाजाच्या व जगाच्या चांगल्यासाठी उपयोगी आणाल ही अपेक्षा.
Currently there are no reviews available for this book.
Be the first one to write a review for the book अर्थ नियोजन व गुंतवणूक.