You can access the distribution details by navigating to My pre-printed books > Distribution
माझी आध्यात्मिक वाटचाल......
मी या विषयावर लिहावं अशी स्वयं शक्तीची इच्छा असावी.
अध्यात्म निरस, रुक्ष किंवा कठीण आहे असं नाही. त्यातही रस आहे, गोडी आहे. भक्ती रस, कारुण्य रस, आनंद, वेगवेगळ्या लीलेच्या अनुभूतींनी भरलेले आहे. इतरांना याबाबतीत अधिक साध्या सोप्या भाषेत माहिती मिळावी, असाही हेतू असू शकतो.
अगदी आता आधुनिक काळातही अध्यात्म सोपं -सरळ आहे. सांसारिक किंवा प्रापंचिक लोकही सहज अंगिकार करु शकतात, असं मला वाटतं.
आता शक्तीकृपेने थोडं थोडं काही जाणवू लागले आहे, समजू लागले आहे. समजण्याचा, जाणण्याचा प्रयत्न करत आहे.
अनुभवाचे बोल
तुमचे हे पुस्तक तुमच्या अनुभवांचे बोल आहेत. अध्यात्म म्हणजे काय असतं त्याचे अनुभव काय असतात हे तुम्ही साध्या सोप्या भाषेमध्ये उलगडून आहे. खूप सुंदर, ओघवत्या आणि साध्या सर्व भाषेतलं पुस्तक आहे. असेच लिहित जा. तुमच्या पुढील अध्यात्मिक वाटचालीसाठी शुभेच्छा.