You can access the distribution details by navigating to My pre-printed books > Distribution
सोनेरी वारसा घडवतो सोनेरी भविष्य आणि आयुष्य
‘इतिहास म्हणजे गूढ-रम्य-रहस्य’ अस बहुतेकांना वाटते आणि हा समज-गैरसमज वर्षानुवर्षे तसाच आहे. परंतु हेही तेवढेच सत्य आहे, की आज जे काही आपण आहोत आणि जे काही आज आपल्यापाशी आहे, ते फक्त जे काही शेकडो-हजारो वर्षांपासून घडले किंवा घडवले त्यामुळेच. आपले आजचे अस्तित्व हे इतिहासाच्या अस्तित्वाचीच परिणती आहे हे आपण सहजगत्या विसरतो, आणि त्या मुळेच की काय, प्रत्येक नवीन पिढी इतिहासकडे जास्त गंभीरपणे न पाहता, फक्त फार पूर्वी घडून गेलेला घटना क्रम याच दृष्टीने पहाते. परंतु आपण हे सोईस्कर रित्या विसरतो की आजचा इतिहास हे कालचे पूर्ण सत्य होते आणि आजचे सत्य हे उद्याचा इतिहास होणार आहे.
आपण हेही लक्षात घेतले पाहिजे की, कालची प्रत्येक घटना किंवा गोष्ट म्हणजे आजचा इतिहास नव्हे आणि आजची प्रत्येक घटना ही उद्याचा इतिहास होणार नाही, किंवा तसे होऊच शकत नाही. फक्त ज्यांनी अडीअडचणी आणि संकटांवर यशस्वी रित्या मात केली, असामान्य कर्तुत्व सिद्ध करून अशा गोष्टी साध्य केल्या ज्या काळाच्याफार पुढे होत्या, ‘असे न भूतो न भविष्यते’ कार्य केले, जे कधी कुणी केले नव्हते आणि जे पुढे होणे नाही, अशाच आणि फक्त अशाच पराक्रमी व्यक्तिंना इतिहासाच्या सुवर्ण पानांमध्ये कायमस्वरूपी जागा मिळाली आणि नेहेमी मिळतेच.
इतिहासात जगायच नसत, पण तरीही इतिहास जगवायचा असतो. इतिहास आपण जगू शकत नाही परंतु इतिहासाने शिकवलेले वास्तववादी तत्वज्ञान नक्कीच जगू शकतो. इतिहास नुसता वाचायच नसतो तर व्यवहारात वागायचा असतो. इतिहासातून शिकायचं ते नवा इतिहास घडवण्यासाठी. कालच असण म्हणजे इतिहास जो आजच्या असण्याला अर्थपूर्ण बनवतो. चांगला कर्तुत्ववान इतिहासच फक्त कर्तबगार भविष्य घडवू शकतो. इतिहास म्हणजे कालच्या हास्यास्पद घटना नव्हेत तर आजच्यासाठी गौरवास्पद आयुष्य घडवणारी जीवन-घटना. इतिहास हा फक्त आवडींनिवडीचा विषय नसून, निकडीचा विषय आहे. इतिहास म्हणजे फक्त तत्ववेक्ते भाषण नसून नव्या पिढीसाठी सत्वयुक्त पोषण आहे.
सशक्त निरोगी शरीरासाठी जसे सत्वयुक्त शक्तिवर्धक पौष्ठिक आहाराची गरज असते तसेच सशक्त समाजासाठी तत्वयूक्त भक्तिवर्धक प्रेरक विचारांची गरज असते. हे प्रेरक आणि पूरक विचार फक्त पराक्रमी आणि गौरवकारक इतिहासच देऊ शकतो.
चूका करणे हा मानव स्वभाव; परंतु केलेल्या किंवा झालेल्या चूका दुरुस्त करण्या सारखे मानवीय दुसरे काही नाही. त्या बरोबरच दुसर्यां नी केलेल्या यशस्वी कार्यातून आणि पराक्रमातून शिकणे व त्यांच्या चांगल्या सवयी, चांगली मूल्ये आणि तत्वे, अंगीकारणे हे ही तितकेच मानवीय आहे. आपल्या हाती सर्व साधन-सामग्री असतांना असाधारण ध्येय साध्य करणे किंवा पराक्रम गाजवणे तसे सोपेच, परंतु सगळ्या परिस्थितीजन्य, नैसर्गिक तसेच मानव निर्मित विविध अडचणींवर मात करून शून्यातून स्वतःचे विश्व निर्माण करणारेच फक्त इतिहास घडवतात हे मात्र तेवढेच खरे.
छत्रपती शिवाजी महाराज हे इतिहासकाळातील असे एक अतिमानवी नायक (सुपरहिरो) आहेत, ज्यांनी इतिहासाच्या पानांमध्ये आपले अढळ स्थान निर्माण केले. आणि तीन शतकां पेक्ष्या जास्त कालावधी नंतर ही ते स्थान अढळ आहे. कारण ते आणि त्यांचे विचार त्यांच्या काळापेक्षा फार-फार पुढे होते. तसेच त्यांची स्वप्ने आणि त्यांचे कर्तुत्व दोन्हीही काळाच्या अतिशय पुढे होते यात काही वाद नाही.
इतिहास वाचायचा आणि इतिहासातून शिकायचे, ते इतिहास घडवण्यासाठी, ही दृष्टी आणि हा विचार ही आज काळाची गरज आहे. हे माझे पुस्तक म्हणजे, एक लहानसा प्रामाणिक प्रयत्न, जेणे करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विस्मयकारक आणि साहसी जीवनापासून प्रेरित होवून, आजच्या काळातही शिकण्यासारखे धडे शोधणे. शिवाजी महाराज हे एक स्वयंनिर्मित राजे आणि छत्रपती सम्राट होते, ज्यांनी आपल्या रांजल्या-गांजल्या रयते साठी स्वतःचे हक्काचे राष्ट्र निर्माण केले, आणि तेही जवळ-जवळ शून्यातून.
त्यांनी आपल्या फक्त ३० वर्षाच्या अल्प राजकीय कारकिर्दीत, १११ नवीन किल्ले निर्माण केले. याचा अर्थ, सर्वसाधारण वर्षाला तीन किल्ले. आणि या व्यतिरिक्त ३०० हून अधिक किल्ले जिंकून त्यांची नव्याने संरक्षक बांधणी करून स्वराज्याला अभेद्य केले. यशाचे आणि नेतृत्व गुणांचे १११ हून अधिक तत्व आणि सूत्र आपण शिवाजी महाराज यांच्या विस्मयकारक आणि साहसी जीवनापासून शिकू शकतो. ही यशाची तत्वे आपणास आजच्या काळातही आपले स्वतःचे स्वयंनिर्मित असे एक राज्य निर्माण करून त्याचा स्वयंनिर्मित राजा होण्यास अत्यंत उपयुक्त ठरू शकतात याची मला खात्री आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अभूतपूर्व, विस्मयकारक, उद्यमशील आणि साहसी जीवनापासून प्रेरित होऊन अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे विविध पैलू तसेच यशस्वी होण्यासाठी लागणार्या, सवयी, गुण आणि विशेष कौशल्य शोधून काढण्याचा लहानसा परंतु अतिशय प्रामाणिक प्रयत्न मी केला आहे. आपण जर ही तत्वे, सूत्रे, तसेच वागणूकी आपल्या स्वतःच्या आयुष्यात प्रामाणिकपणे अमलात आणल्या, तर महाराजांप्रमाणे मोठे बलाढ्य राष्ट्र जरी नाही निर्माण करता आले तरी यशाचे एक छोटेसे स्वराज्य-बेट तरी नक्कीच निर्माण करू शकाल.
आपण आपले अमूल्य धन आणि वेळ, हे पुस्तक विकत घेण्यासाठी व वाचण्यासाठी खर्च केलेत, तसेच स्वतःच्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी एक पाऊल पुढे टाकून प्रामाणिक प्रयत्न केलात, यासाठी आपले मनपूर्वक अभिनंदन आणि धन्यवाद.
Re: शिवगाथा भाग एक (e-book)
[7/20, 22:03] Vishal kuhite: Sir tumche shivgatha pustak aaj vachun baghitl,khup chhan vatl.
Aplya jivnat avashyak asnare sarv pailu tumhi khup sundar ani sadhi shabdh rachna keli ah.
Mla he pustak vachayla dilya baddal khup khup dhanyvad....
[7/20, 22:04] Vishal kuhite: Tumchya ya amulya dnyanacha sangrah aslelya pustkala abhipray denya itka mi motha nhi....
[7/20, 22:05] Vishal kuhite: Kahi chuklyas kshama asavi