You can access the distribution details by navigating to My pre-printed books > Distribution
‘इतिहास म्हणजे गूढ-रम्य-रहस्य’ अस बहुतेकांना वाटते आणि हा समज-गैरसमज वर्षानुवर्षे तसाच आहे. परंतु हेही तेवढेच सत्य आहे, की आज जे काही आपण आहोत आणि जे काही आज आपल्यापाशी आहे, ते फक्त जे काही शेकडो-हजारो वर्षांपासून घडले किंवा घडवले त्यामुळेच. आपले आजचे अस्तित्व हे इतिहासाच्या अस्तित्वाचीच परिणती आहे हे आपण सहजगत्या विसरतो, आणि त्या मुळेच की काय, प्रत्येक नवीन पिढी इतिहासकडे जास्त गंभीरपणे न पाहता, फक्त फार पूर्वी घडून गेलेला घटना क्रम याच दृष्टीने पहाते. परंतु आपण हे सोईस्कर रित्या विसरतो की आजचा इतिहास हे कालचे पूर्ण सत्य होते आणि आजचे सत्य हे उद्याचा इतिहास होणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज हे इतिहासकाळातील असे एक अतिमानवी नायक (सुपरहिरो) आहेत, ज्यांनी इतिहासाच्या पानांमध्ये आपले अढळ स्थान निर्माण केले. आणि तीन शतकां पेक्ष्या जास्त कालावधी नंतर ही ते स्थान अढळ आहे. कारण ते आणि त्यांचे विचार त्यांच्या काळापेक्षा फार-फार पुढे होते. तसेच त्यांची स्वप्ने आणि त्यांचे कर्तुत्व दोन्हीही काळाच्या अतिशय पुढे होते यात काही वाद नाही.
इतिहास वाचायचा आणि इतिहासातून शिकायचे, ते इतिहास घडवण्यासाठी, ही दृष्टी आणि हा विचार ही आज काळाची गरज आहे. हे माझे पुस्तक म्हणजे, एक लहानसा प्रामाणिक प्रयत्न, जेणे करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विस्मयकारक आणि साहसी जीवनापासून प्रेरित होवून, आजच्या काळातही शिकण्यासारखे धडे शोधणे. शिवाजी महाराज हे एक स्वयंनिर्मित राजे आणि छत्रपती सम्राट होते, ज्यांनी आपल्या रंजल्या-गांजल्या रयते साठी स्वतःचे हक्काचे राष्ट्र निर्माण केले, आणि तेही जवळ-जवळ शून्यातून.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अभूतपूर्व, विस्मयकारक, उद्यमशील आणि साहसी जीवनापासून प्रेरित होऊन अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे विविध पैलू तसेच यशस्वी होण्यासाठी लागणार्याऊ सवयी, गुण आणि विशेष कौशल्य शोधून काढण्याचा लहानसा परंतु अतिशय प्रामाणिक प्रयत्न मी केला आहे. आपण जर ही तत्वे, सूत्रे, तसेच वागणूकी आपल्या स्वतःच्या आयुष्यात प्रामाणिकपणे अमलात आणल्या, तर महाराजांप्रमाणे मोठे बलाढ्य राष्ट्र जरी नाही निर्माण करता आले तरी यशाचे एक छोटेसे स्वराज्य-बेट तरी नक्कीच निर्माण करू शकाल.
समोर ठाकलेली परिस्थिति, हाती असलेले कार्य, आखलेली मोहिम आणि लोकांची कार्यक्षमता, यानुसार जी नेतृत्व शैली अनुकूल असेल ती योग्यवेळी कशी वापरावी हे विलक्षण कौशल्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगी होते.
विविध प्रसंगी शिवाजी महाराजांनी अमलात आणलेली नेतृत्व शैली जर आपण अभ्यासली तर आपल्याला हे जाणवते की विविध नेतृत्व शैलींचे त्यांना सखोल ज्ञान होते आणि योग्य जागी, योग्य लोकांकडून योग्य काम करून घेण्यासाठी विविध शैली चातुर्यपूर्ण वापरण्याचे महत्व शिवाजी महाराजांना ज्ञात होते, हे नक्की.
Re: शिवगीता भाग २ (e-book)
शिवगाथा वाचत असताना, प्रत्येक वेळी नव्याने उलगडत जाते. तुम्ही अभिप्राय मागितला. पण जर सांगू मी आता पर्यंत तीन वेळा वाचला. खूप समजून घ्यायचे आहे. पण हे नक्की की मी ज्यावेळी हताश असते. आणि कोणतेही पान उलगडले तर मला उत्तर मिळते, प्रेरणा मिळते. मुलासाठी इंग्रजी हवे. मला त्याला सांगावे लागणार नाही... Dr manisha jagtap pune