You can access the distribution details by navigating to My pre-printed books > Distribution

Add a Review

मन माझे ओढाळ ओढाळ (eBook)

Type: e-book
Genre: Self-Improvement
Language: Marathi
Price: ₹0
Available Formats: PDF

Description

आयुष्याच्या संध्याकाळी पैलतीराची चाहूल लागते आणि साठलेल्या भावना उफाळून वरती येऊ लागतात. प्रत्येकाच्या जीवनामध्ये असा हा एक काळ येत असतो आणि मग वाटू लागते, आजवर आपले घुसमटलेले, दबुन राहिलेले मनातील विचारतरंग कुठेतरी मोकळे करून मन हालके करावे.

दैनंदिन जीवन जगताना आपल्या ज्या कांही चुका झाल्या, ज्यांच्या परिणामी आपल्याला ताण-तणाव, अपेक्षाभंग, त्रास, दुःख यांना सामोरी जावे लागले त्यांची कुठेतरी नोंद केली जावी.

प्रेम, माया, करूणा, परस्पर सौहार्द, धैर्य, प्रामाणिकपणा, कृतज्ञता या व अशा भावनांबरोबरच द्वेष, क्रोध, भय, मत्सर, नैराश्य, खंत, या अशा अगणित भावना आपल्याच एका मनामध्ये आहेत, हे सत्य जसे स्वतःला समजुन चुकले तसे इतरांनीही सोप्या, सामान्य दैनंदिन बोलीभाषेमध्ये समजावे.

आणि जीवनाची वाटचाल सुखाची, समाधानाची, तृप्ततेची होण्यासाठी नेमकी कशाची आवश्यकता आहे याची आपल्याला अनुभवाने जी जाण आली, त्याची इतरांना माहिती व्हावी या उद्देशाने ‘अंतरंगा’मध्ये जे बोल उठले ते म्हणजे या कथा आणि त्यांचा संग्रह ‘मन माझे ओढाळ, ओढाळ’!

अनुभवाचे आहेत हे बोल, नका विसरू त्यांचे मोल।
उमटत असती प्रत्येक अंतरी, वळून पाहता माघारी।।

About the Author

बोल अंतरंगाचे

मानवी जीवन अगम्य आहे. अचानक कांही घटना घटतात अन् सरळ चाललेल्या जीवनाचा प्रवाह बदलून जातो. आता माझे म्हणजे या पुस्तकाच्या लेखकाचे, ज्याला व्यवहारासाठी अन्य लोक राजा सांगलीकर, या नांवाने ओळखतात. मी, राजा सांगलीकर, एक जीवंत, चांगल्या, वाईट हजारो भावनांनीयुक्त सर्वसामान्य मनुष्य. खरंतर, लेखन हा कांही माझा पेशा नाही. आयुष्यातील बराचसा काळ बँकेमध्ये नोकरी करण्यात गेला आणि ती सोडल्यानंतर इतर अनेक व्यवसाय (उपद्व्याप) करण्यात घालवला.

पण, जीवनामध्ये एक काळ असा आला, आणि जाणवले आपण समजतो तसे हे जीवन नाही. मी ह्याँव करीन आणि त्याँव करीन म्हणणे सोपे आहे पण वास्तविकता कांही वेगळीच आहे आणि जाणवते, 'पराधिन आहे जगती पुत्र मानवाचा'

बस्स, ही जाणीव झाली की मग शोध सुरू झाला. 'स्व'चा ! कुठेही, दिशाहिनपणे भटकणारी पाऊले
प्रथमच ख-या अर्थाने देवालयाकडे वळली. इतरांवर क्षुल्लकशा कारणानेही उठणारे हात कुठल्यातरी अज्ञाताच्या दिशेने जोडले जाऊ लागले. प्रारब्धामध्ये लिहीले असावे त्यामुळे एक प्रकाश किरण
जीवनामध्ये आला आणि अंधारामध्ये चाचपडत चाललेल्या माझ्या अज्ञ जीवाला मानवी जीवनाचा अर्थ समजाऊन देऊ लागला.

हळूहळू मनाची कवाडे उघडी होऊ लागली. आपले कुठे चुकले, कसे चुकले, भावनेच्या भरात आपण कसे वाहत गेलो याचा चलत् चित्रपट डोळ्यासमोर उभा राहू लागला. पुर्वी केलेल्या चुका, कुभावना, कुविचार टाळून जीवन जगण्याचा प्रयत्न सुरू झाला आणि त्यातून कांहीतरी सत्य समजुन चुकले.

हे सर्व घडत असत असतांनाच 'त्या अंतिम सत्याची' चाहूल लागली. आपल्या जीवनाचा फारसा कांही उपयोग झाला नाही याची खंत वाटू लागली. त्यातूनच आपण चुकलो हे मान्य करून आपल्या चुका, आपल्या अंतरीचे बोल कुणालातरी, कधीतरी मार्गदर्शक होतील या उद्देशाने नमुद करून ठेवण्यास सुरूवात झाली.

आणि निर्मीती झाली या कथासंग्रहाची, दैनंदिन जीवनातील घटनांच्या घडामोडीतून मनांत उमटलेल्या विचारांची, जोडीला आलेल्या कवितांची आणि त्यातून दृश्य स्वरूपात निर्मीती झाली 'मन माझे ओढाळ ओढाळ', या कथा संग्रहाची.

या कथा संग्रहातील अंतरीचे बोल जसे माझ्या मनांला जीवनामध्ये कांहीतरी चांगले केल्याचे साफल्याचे समाधान देऊन राहिले आहेत त्याच प्रमाणे वाचकांना आनंद देईल अशा भावनेने समर्पण!!!!

Book Details

Publisher: self publisher
Number of Pages: 108
Availability: Available for Download (e-book)

Ratings & Reviews

मन माझे ओढाळ ओढाळ

मन माझे ओढाळ ओढाळ

(Not Available)

Review This Book

Write your thoughts about this book.

Currently there are no reviews available for this book.

Be the first one to write a review for the book मन माझे ओढाळ ओढाळ.

Other Books in Self-Improvement

Shop with confidence

Safe and secured checkout, payments powered by Razorpay. Pay with Credit/Debit Cards, Net Banking, Wallets, UPI or via bank account transfer and Cheque/DD. Payment Option FAQs.