You can access the distribution details by navigating to My pre-printed books > Distribution
मला माझ्या मुलाचे संगोपन करत असताना खूप लोकांची मदत झाली. माझा मुलगा अनय, त्याचे मित्र; काही जवळचे, काही दूरचे, त्याचे शिक्षक, मित्रांचे पालक या सर्वांची देखील खुप मदत झाली. येणाऱ्या समस्या, अडचणी त्यावर कशी मात करावी? मुलांना हट्टाच्या वेळी कसं त्यांचे मन कसे वळवावे, त्यांना संस्कार कसे करावे हे सगळे, मुलं वाढवत असताना मी शिकत होते. आणि मग त्यांचे मन वळवण्यासाठी कल्पना सुचत गेल्या. त्यांचा उपयोग देखील झाला.
या गोष्टी मी संस्कार शिबिरामध्ये मुलांना देखिल सांगितल्या. तेव्हा देखील ह्या गोष्टींचा त्या मुलांवर चांगला परिणाम होतो आहे हे मला जाणवलं. मुलं माझ्याशी बोलायची तेव्हा हा अनुभव मला आला. त्यामुळे मी जेव्हा त्यांना समजवायची, ते मी गोष्टी स्वरूपात त्यांना सांगत होती. त्याच गोष्टी मी आता शब्दांकित केल्या आहेत आणि सर्वांसमोर सादर करत आहे.
पालकांना देखिल ह्या कथा त्यांच्या मुलांच्या संगोपन व संस्कारासाठी उपयोगी पडतील.
Currently there are no reviews available for this book.
Be the first one to write a review for the book मुलांसाठी संस्कार कथा.