You can access the distribution details by navigating to My pre-printed books > Distribution

(2 Reviews)

मु.सा.फि.र. (eBook)

मु.सा.फि.र.
Type: e-book
Genre: Entertainment, Science Fiction & Fantasy
Language: Marathi
Price: ₹150
(Immediate Access on Full Payment)
Available Formats: PDF

Also Available As

Also Available As

Description

मराठी वाचकांना भावेल अशी माहिती तंत्रज्ञानावरील वैज्ञानिक काल्पनिका कादंबरी सहजी उपलब्ध होत नव्हती. त्यांची मराठी कादंबरीची तृषा भागविण्यासाठी मु.सा.फि.र.चे प्रयोजन !
मु.सा.फि.र. ही आजच्या तरुण पिढीला भावेल अशी एक माहिती तंत्रज्ञानावर आधारित असलेली वैज्ञानिक काल्पनिका आहे.
दिल्लीतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये एम.बी.ए. शिकणाऱ्या मुला मुलींच्या ग्रुपपासून ही कथा सुरु होते. या ग्रुपमधील सर्वच मुले-मुली ही आपापल्या परीने हुशार आहेत. आजची तरुण पिढी राष्ट्रप्रेमाने झपाटलेली आहे. देशासाठी काहीतरी भव्य दिव्य करावे असे प्रत्येकाला वाटते. सुरुवातीला प्रेमकथेचे स्वरूप वाटणारी कथा, प्रत्येक पात्रांच्या योगदानाने वेगळी कलाटणी घेते. रजत या धाडसी पात्राच्या एंट्री नंतर कथा आणखी वेगळे वळण घेते.
वैज्ञानिक काल्पनिका या साहित्य प्रकारात अनेक उपप्रकार मोडतात. मु.सा.फि.र. ही मिलिटरी इंटेलिजन्सशी निगडीत असलेली कथा आहे. गोंधळाचे आणि दहशतीचे वातावरण निर्माण करून भारताच्या प्रगतीस खीळ घालण्याचे आंतरराष्ट्रीय अतिरेकी संघटनाचे इरादे, सौरभ, शिरीन आणि रजत त्यांच्या कुशाग्र बुद्धिमत्तेने उधळण्याचा प्रयत्न करतात. तसे करीत असतांना त्यांना निरनिराळ्या जीवघेण्या संकटांना सामोरे जावे लागते. आजची तरुण पिढी सर्व प्रकारची आव्हाने पेलून संकटांचा नेटाने सामना करण्याची ताकत ठेवून आहे याचा प्रत्यय सौरभ शिरीन आणि रजत या पात्रांच्या धैर्यावरून दिसून येतो .
या कथेतील पात्र आणि प्रसंग हे काल्पनिक असले तरी कथा ज्या ठिकाणी घडत जाते ती स्थळे काल्पनिक नाहीत. कथेत जिवंतपणा येण्यासाठी स्थळांची माहिती विस्ताराने दिलेली आहे. नैनिताल येथील स्थळांचे वर्णन हे जसे प्रत्यक्षात आहे तसेच रेखाटले आहे. नैना पिक किंवा चायना पिकवरून पाहिल्यास खरोखरच चायना बॉर्डरच्या दिशेला असलेले रडारचे अँटेने दिसतात.
मिलिटरी इंटेलिजन्स सर्व्हिसेस नावाची गुप्तहेर यंत्रणा हा कल्पेनेचा आविष्कार आहे.
मु.सा.फि.र. असे सांकेतिक नाव असलेल्या रडार प्रणालीने दिलेल्या दृक्श्राव्य माहितीच्या आधारे रजत अतिरेक्यांची कारस्थाने उधळून लावतो.
पैश्याचा लोभ एखाद्या माणसाला किती खोलवर गर्तेत घेऊन जाऊ शकतो याचे उदाहरण म्हणजे या कथेतील रोहित हे पात्र होय.
कथेची मांडणी अशा रितीने केलेली आहे की क्षणभर असं वाटून जातं, ‘ खरंच असं घडू शकतं ?’ तारुण्य सुलभ साहसातून कशी संकटे उद्भवू शकतात याचे वर्णन सत्यास अनुसरून केलेले आहे. कथेत इंग्रजी शब्दांचा वापर हा अनिवार्य म्हणून केलेला आहे. निव्वळ शुद्ध मराठी शब्द वापरून कथेची मांडणी करता आली असती पण त्यामुळे कथा निष्प्राण होण्याची भीती होती. त्यामुळे प्रचलित इंग्रजी शब्दांचा वापर केलेला आहे.

सुनिल वाईकर

About the Author

लेखकाचे मनोगत ...........................................
मी एक इलेक्ट्रिकल इंजिनियर असून महाराष्ट्रातील अग्रणी विद्युत वितरण कंपनीमधून अधिक्षक अभियंता या पदावर सेवानिवृत्त झाल्यावर या कथेची रेखाटणी केली आहे. मला लहानपणापासून वाचनाची आवड असल्याने, मी मराठीतील बहुतेक प्रथितयश लेखकांचे साहित्य वाचलेले आहे. त्याचप्रमाणे इंग्रजी कादंबरी वाचन हा देखील माझा नित्य आवडीचा छंद राहिलेला आहे. वैज्ञानिक काल्पनिका या वर्गवारीतील साहित्य असो, की पहिल्या व दुसऱ्या महायुद्धातील सुरस कथा असोत, मला त्या सारख्याच भावतात. त्याचप्रमाणे ऐतिहासिक तसेच पौराणिक कथानके देखील वाचतांना त्या काळात रमणे, ही माझी नित्याची आवड आहे. माहिती व तंत्रज्ञान या आजच्या परवलीच्या विषयामध्ये असलेल्या रुचीमुळे माझ्या सेवानिवृत्ती नंतरच्या सुरुवातीच्या निवांत काळातच मला मु.सा.फि.र.चे कथानक स्फुरले. कथेची मांडणी करतांना त्यातील पात्रांची जेंव्हा मी जुळवाजुळव करण्यास सुरुवात केली, तेंव्हा ती पात्रे स्वतःच माझ्या लेखणीतून स्क्रीनवर अवतरून आपले व्यक्तिमत्व खुलवित होती. कथेचा व्याप जसजसा वाढत गेला तसे माझ्या हे लक्षात आले की, मी फक्त निमित्यमात्र असून कथेचा रंगमंच पात्रांनी त्यांच्या सोयीनुसार आधीच नियोजिलेला आहे. तो रंगमंच मी माझ्या मताने वळविण्याचा प्रयत्न करून देखील त्यातील पात्रेच माझ्या लेखणीवर हावी झाली. मी एक लेखकापेक्षा त्या रंगमंचावरील चाललेला नाट्यमय घटनाक्रम अनुभवण्यात दंग झालो. असाच जिवंत अनुभव ही कथा वाचतांना प्रत्येक वाचकास येवो हा प्रयत्न.......................
सुनील वाईकर
'नक्षत्र' ,वास्तू पार्क, जय भवानी मार्ग ,नाशिक रोड.४२२१०३
भ्रमणध्वनी : ८९२८९७९२२२

Book Details

Number of Pages: 266
Availability: Available for Download (e-book)

Ratings & Reviews

मु.सा.फि.र.

मु.सा.फि.र.

(5.00 out of 5)

Review This Book

Write your thoughts about this book.

2 Customer Reviews

Showing 2 out of 2
pradnya 9 years, 9 months ago

Re: मु.सा.फि.र. (e-book)

या कादंबरीचा preview वाचल्यानंतर मी पूर्ण पुस्तक वाचल्याशिवाय थांबूच शकले नाही. कथेतील गूढ रहस्य शेवटपर्यंत वाचकाला खिळवून ठेवते आणि कथेला रोचक बनवते. कथेची रचना आणि पात्रांची सांगड अतिशय उत्कृष्ट पद्धतीने लेखकाने केली आहे. मराठी वाचकांना आणि खासकरून तरुण पिढीसाठी हि कादंबरी आहे. प्रत्येकाने जरूर वाचावी.

Sunil Waikar 9 years, 9 months ago

Re: मु.सा.फि.र. (e-book)

MU.SA.FI.R. is really a great science fiction ever read in Marathi.
The story keeps you reading till the end.The plot in the story is simply superb!!.
Ambiance of the places described in the novel is felt as it is while reading it.
While you reach the climax, you are compelled to think, 'This can happen easily".
Nice presentation of the dare devil youths.
Rating:

Other Books in Entertainment, Science Fiction & Fantasy

Shop with confidence

Safe and secured checkout, payments powered by Razorpay. Pay with Credit/Debit Cards, Net Banking, Wallets, UPI or via bank account transfer and Cheque/DD. Payment Option FAQs.