You can access the distribution details by navigating to My pre-printed books > Distribution
विनोद, मर्मिक व्यंग, सौम्य शॄंगार, स्वैर कल्पनाविलास, साहस, प्रणय यांनी बहरलेला ’पैसा वसूल’ कथासंग्रह !
पाश्चात्य राहणीत रमलेल्या, महत्वाकांक्षी विवाहित मराठी स्त्रीच्या कल्पनेतून बहरलेला ’एथ्निक वऱ्हाडी हॉलिडे’, एकतर्फी प्रेमाला शिताफीने, सौजन्याने व अक्कलहुशारीने ’सन्माननीय माघार’ घ्यावयास लावणाऱ्या बहादूर युवतीची कथा, मुंबईतल्या वीतभर जागेत आनंदाने जीवन कंठणाऱ्या हजरजबाबी गॄहिणीची कथा, असं खरंच घडलं असेल का?’ ही अध्यात्मिक अघटित कथा, ’लाडूप्रसाद आणि जिलबीदेवी’च्या लग्नाचा आखोंदेखा हाल, ’मी ही आणि तिचा विजय’ ही पोलिस प्रेम कथा, ’आयसिंग ऑन द केक’ या कथेतील प्रेमळ पण करारी आई, ’याहो क्लिंटन अमुच्या गावा’ ही मार्मिक व्यंग कथा, डॉ. बोथट सुईगोळ्यांचे ’हंसा आणि लटठ व्हा’ चे वैद्यकिय क्षेत्रात खळबळ उडवून देणारे तत्वज्ञान, खुशाल डॉट चेंडू’च्या चतुर्थीच्या उपवासाची कथा, आश्लेषा नक्षत्राबद्दलची गैरसमजूत दूर करणारी ’आश्लेषाची सासू’, नंदीने नवी दिल्लीत खाल्लेल्या चाऱ्याचा अहवाल देणारी’ तहलका नॉट ऑन’ कथा, ब्रह्मदेवांनी विकेंद्रीकरण केल्यामुळे जगाचं रहाटगाडगं थांबल्याची कथा, ’मनी, मन्या मनोरमा’ मधल्या टॉमबॉयची चंद्राबरोबर झालेली जुगलबंदी, ’यनानाचं परियावरन’ मधल्या यत्किंचित नागपुरी नागरिकाचे डोळे गपकन बंद करावयाला लावणारी कथा, ’वाय टू के कम्प्लायंट वधू पाहिजे’ मधल्या अर्वाचिन युगातील वर-वधू संशोधनाची मोहीम आपल्याला नक्कीच खिळवून ठेवील.
Currently there are no reviews available for this book.
Be the first one to write a review for the book फणसाचे गरे.