You can access the distribution details by navigating to My pre-printed books > Distribution

फणसाचे गीतगरे (eBook)

गीतसंग्रह
Type: e-book
Genre: Poetry, Coffee Table Book
Language: Marathi
Price: ₹0
Description of "फणसाचे गीतगरे"

’फणसाचे गीतगरे’ या गीतसंग्रहात बाल-कुमार-किशोर-तरुण-प्रौढ-वृद्धांना आवडतील अशी गीते आहेत. विनोद, भक्ति, प्रेम, विरह, विवाह, निसर्ग, भाव, उत्सव, उल्हास, उपहास, प्रेरक, आनंद, आव्हान, उद्बोधक, शृंगार, विज्ञान, स्वगत, वात्सल्य, अंगाई, राष्ट्रगीत, करुणा, चिंतन कव्वाली, गज़ल, इत्यादी विविध रसांतील गीत प्रकारांची अनुभूती घेण्यासाठी गाण्यांना स्वत:च चाली लावून गा. देवगीत हा नवीन गीतप्रकार या गीत संग्रहात आहे. भक्तिगीतात भक्त देवाशी संवाद साधतो. य़ा उलट देवगीतात देव भक्ताला उद्देशून काही सांगतांना दिसतो. गीत क्रमांक १, ३१ आणि ९९ देवगीते आहेत. गीत क्रमांक १०२ अंगाई गीत आहे.

About the author(s)

गाणी ऐकता ऐकता ऐकता विडंबन करणे पुष्कळ जणांना साधते पण सुहास फणसे यांची गीते ही विडंबने नसून स्वतंत्र गीते आहेत. या गीतसंग्रहात आपल्याला बहुरंगी गीते गायला मिळतील. प्रसिद्ध गायकाच्या कार्यक्रमाला गेल्यावर बहुतेक श्रोते मनातल्या मनात गात असतात, हे त्यांच्या ओठांच्या हालचालीवरून लक्षात येते. अनवधानाने काही श्रोत्यांच्या मुखातून आवाज शेजारच्या श्रोत्यांना ऐकू येऊ लागतो. थोडक्यात काय तर आपणा सर्वांना स्वत: गाण्यात खूप मजा येते. म्हणूनच गाणी ऐकता ऐकता निर्माण झालेली सुहास फणसे यांची गीते वाचली नव्हे, तर गायली जावीत असा त्यांचा आग्रह असतो. गीतांना चाली लावणे सर्वांनाच जमते, असे नाही, हे लक्षात घेऊन चाल सुचविण्यासाठी त्यांनी तयार केलेले व्हिडिओज युट्युबवर उपलब्ध आहेत
त्यांचा ’फणसाचे गरे’ हा कथा संग्रह नुकताच पोथी डॉट कॉम वर ई-प्रकाशित झालेला आहे. ’उचललं पेन आणि लावलं कागदाला’ हा लेखसंग्रहही ई-प्रकाशनाच्या मार्गावर आहे.

Book Details
Number of Pages: 91
Availability: Available for Download (e-book)
Other Books in Poetry, Coffee Table Book

Shop with confidence

Safe and secured checkout, payments powered by Razorpay. Pay with Credit/Debit Cards, Net Banking, Wallets, UPI or via bank account trasnfer and Cheque/DD. Payment Option FAQs.