You can access the distribution details by navigating to My pre-printed books > Distribution
असं म्हणतात गोष्टी जशा दिसतात, तशा त्या नसतात. बरेचदा हे वाक्य अयोग्य ठरते. परंतू कधी कधी वास्तवीक जीवनात असे प्रसंग समोर येतात, ज्या सत्य आणि असत्य ओळखने अशक्य असते.
असेच काहीसे झाले सेल नंबर ४४ सोबत. सेल म्हणजे मनोरुग्णांची वैयक्तीक खोली आणि साध्या भाषेत सांगायचं झालं तर मनोरूग्णांचे तुरूंग. अतीहिंसक आणि अतीगंभीर रुग्णांना अशा सेलमध्ये ठेवले जायचे. त्यापैकी सेल नंबर ४४ हा कुख्यात होता. कारण बऱ्याच वर्षांपुर्वी सेल नंबर ४४ मधल्या रुग्णाचा पळुन जाण्याच्या प्रयत्नात अपघात झाला आणि त्यात त्याचा मृत्यु झाला होता. परंतू त्याने सेल नंबर ४४ ला स्वतःचे घर म्हणुन स्विकारले होते आणि मरण्यापुर्वी त्या सेलच्या भिंतीवर - “जगातील सर्वात सुरक्षीत जागा आपले घर असते.” असे रक्ताने लिहिले होते. सगळ्यांनाच वाटत होतं की तो त्या सेलला सोडून कधी गेलाच नाही. त्याचं अस्तित्व अजुनही त्याच सेलमध्ये असल्याचे तिथल्या कर्मचाऱ्यांना जाणवायचे.
परंतू खरंच असं असेल का... अमेय नावाचा एक इन्टर्न डॉक्टर त्या मनोरुग्णालयात जॉईन होतो आणि हळुहळु त्याला हॉस्पीटलमध्ये चाललेला प्रकार...
Currently there are no reviews available for this book.
Be the first one to write a review for the book सेल नंबर ४४.