You can access the distribution details by navigating to My pre-printed books > Distribution
गझलनवाज पं.भीमराव पांचाळे हे मराठी गझलेच्या विष्वातील एक अत्यंत महत्वाचे नाव आहे. गझलनवाज या विषेशणाने ओळखले जाणारे भीमराव पांचाळे यांनी मराठी गझलांना एक नवा आयाम दिला आहे. त्यांच्या गझलांमध्ये भावनांचाी खोली, षब्दांची निवड आणि संगीताची एक सुंदर लय यांचा सुरेख मिलाफ आढळतो. त्यांनी गझलेच्या माध्यमातुन मराठी साहित्याला एक नवी दिषा दिली आहे. भीमराव पांचाळे यांच्या गझलांमध्ये सामाजिक जाणिव, प्रेम, विरह, आणि जीवनाच्या विविध पैलुंचे प्रतिबिंब दिसते. त्यांच्या गझलांमधुन मराठी भाशेची श्रीमंती आणि साहित्यिक परंपरा जपण्याचा त्यांचा प्रयत्न स्पश्टपणे जाणवतो.
विसाव्या षतकात संगीत कलेच्या प्रवाहात सुगम संगीताच्या एका नवीन षैलीचे आगमन झाले. त्यालाच वर्तमान काळात गझल म्हणून ओळखले जात आहे. वास्तविकता पाहता गझल हे ठुमरीतुन निर्माण झालेला एक गीत प्रकार आहे. ज्यात आधुनिक विज्ञानाच्या योगदानामुळे नाविन्य निर्माण झाले. आजच्या सर्वसामान्य जनतेसाठी गझल हे अत्यंत प्रभावी मनोरंजनाचे साधन झाले आहे. यात मनुश्य आपल्या जीवनाषी निगडीत घटना अनुभवतो. त्यांच्याषी त्यांचा भावनिक संबध जोडलेला असतो. दुसरी महत्वाची गोश्ट म्हणजे भीमरावजींच्या आजच्या ग़झलगायनात समाजाला संस्कार प्रदान करण्यात मराठी ग़झलगायनाची महत्वाची भुमिका आहे. कारण प्रतिभेचे पोशण हे संस्कारानेच होत असते.
संपूर्णपणे स्वरप्रधानते कडे झुकलेले षास्त्रीय संगीत रागनियम, रागस्वरूप, आलापचारी, लयकारी, ताना इत्यादींवर अवलंबून आहे. तर उपषास्त्रीय संगीतात षास्त्रीय संगीताचे कडक नियम षिथील करून समप्राकृतिक रागांमध्ये संचार करायला मुभा दिली गेल्याने त्यातून निर्माण होणाÚया स्वरवैचित्र्याने सर्व रसिकांच्या मनाची चटकन पकड घेतली. उपषास्त्रीय संगीतात षब्दरचना व तिच्या आषयातील भावार्थाला खूप महत्व आहे. कारण त्याचा स्वराविश्कार हे लोकसंगीताने भारतीय संगीतातील उपषास्त्रीय संगीताला दिलेली देण आहे. वरील सर्व तत्वे भीमराव पांचाळे यांच्या सांगीतिक व प्रतिभेचा एक सुंदर कलाविष्कार म्हणजेच त्यांचे गझलगायन होय.
हिंदीमध्ये लोकप्रिय झालेली, फुललेली गझल, मराठीत मात्र लेखनापुरतीच मर्यादित होती. कवीवर्य सुरेष भट व मोजकेे गझलकार मराठी गझल लिहित होते. सुरेष भट मात्र आपल्या स्वतःच्या गझल ‘तरन्नुम’ च्या अंदाजाने सादर करत असत. त्यास भीमरावजी मंचिय सादरीकरण असे मानतात. पण त्याच गझलेला स्वरसाज मात्र कुणी चढवत नव्हते. हे अव्हान पेललं ते गझलनवाज़ भीमराव पांचाळे यांनी. स्टेट बंॅकेतील रूक्ष, यांत्रिक वातावरणात, दिवसातले आठ-आठ तास काम करण्याचे प्रारब्ध हसतमुखाने रोज पारपाडणाÚया या कलावंताने, आपल्या कंठातील स्वर व हृदयातला सुर सदैव जपला! आपल्याच सारखे गझलवर प्रेम करणारे चार ‘साजिंदे’ पैदा केले. अर्धांगिनीची तंबोÚयावरील सुरेल साथही लाभली आणि स्वरसंगीताचा साज झालेल्या मराठी गझलेचा अविश्कार करण्यास भीमराव पांचाळे सज्ज झाले
‘गझलनवाज भीमराव पांचाळे यांच्या षास्त्रीय, उपषास्त्रीय संगीताचा चिकित्सक अभ्यास: एक योगकार्य’ या विशयावर राश्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने सन 2019 मध्ये आचार्य पदवी बहाल केली. त्याच प्रबंधाचे पुस्तकरूपाने मराठी गझलेचा सारथी...गझलनवाज भीमराव पांचाळे या नावाने प्रकाषीत करतांना मला अतिव आनंद होत आहे की, सदर पुस्तक गझलगायक, रसिक, संषोधक, संगीत प्रेमी, विद्यार्थी, संदर्भग्रंथ वाचक यांना भीमरावजी यांच्या विशयी सखोल ज्ञान वृध्दींगत करण्यास मदत होईल. समग्र भीमरावजी अभ्यासतांना ज्ञानाच्या कक्षा अजुनच रूंदावल्याचा अनुभव आला. लेखलनात्मक स्वरूपातील पहीलाच प्रयत्न वाचकांसमोर सादर करतांना मन आनंदी आहे. आषा करतो की वाचक प्रेमी या पेषकषला उदंड प्रतिसाद देउन माझा उत्साह वृध्दिंगत करतील असा विष्वास आहे.
Currently there are no reviews available for this book.
Be the first one to write a review for the book मराठी गझलेचा सारथी...गझलनवाज भीमराव पांचाळे.