You can access the distribution details by navigating to My pre-printed books > Distribution
लहान असताना सभवताली खूप घटना घडून गेल्या काळ लोटला . व्यथा मात्र अजूनही तश्याच होत्या. पूर्वीचे दिवस हळूहळू बदलत गेलें तश्याच चिंता आणि काळजी देखील वाढत गेली .एकत्र कुटुंब नाहीशी होत असतांना . खंत वाटतें ती आजी आजोबांनी जे आजपर्यंत संस्कार केलें .ते पुढच्या पिढीला मिळतीलच असं नाही . घराचा फ्लॅट झाला "आणि आजी आजोबाच्या गोष्टी कुठंतरी बंदिस्त होतं गेल्या.प्रत्येक घरात म्हातारी मानस आहेत. खर तर आपल्याला त्यांची गरज आहे. तरीही ती नको असतात. वयाप्रमाणे स्वभाव बदलत जातो. त्यांच वागण बोलण आणि राहणं. आपल्याला लज्जास्पद वाटू लागत. आजपर्यंत त्यांनी आपल्यासाठी काय केलंय. याचा हीं विसर पडतो. सध्या परिस्थिती खूपच अवघड आहे.
जिवंत असे पर्यंत माणसाला संघर्ष हा करावाच लागतो . त्यात कुणाचीहीं सुटका झालेली नाही. बालपण, तारुण्य , आणि म्हातारपण असा प्रवास करत माणूस आयुष्याच्या शेवटच्या टप्यात पोहचतो. जनरल बघायाचं तर हे सर्वाना ठाऊकच आहे. आपण सर्व एक दिवशी म्हातारं ..होणार.
अस असलं तरीही प्रत्येक वयातला प्रवासात भावना वेगळ्या असतात. अनेक जबाबदाऱ्या पेलून संघर्षाचा टप्पा संपतो. आणि एका दिवशी हातात काठी येते. त्या काठीवर पुढचे राहिलेले दिवस.. मोजता मोजता म्हातारपण संपून जात. भूतकाळ वर्तमानात प्रवेश करतो. जुन्या जखमा चिगळू लागतात. अंधारात जुन्या आठवणीना उजाळा मिळतो. तुटलेली जपलेली नाती गोती .. जमा बेरीज सुरू होते वार्धक्य म्हणजे आपल्या स्वाभिमानाची उपेक्षा करण्यासारखं शरीराने थकलेल्या माणसाला काही प्रमाणात जगण्याची उमेद असेलही पण वयामुळे आलेल्या थकव्या ला उभारी कुठून येणार चार भिंतीत ला संवाद हरवत गेल्याने माणसाचं आयुष्य एकाकी होत चाललंय " म्हातारपण म्हणजे मावळतीच्या सूर्याची तांबडी पुसट रेषा बघत परतीची वाट बघत राहणे .आपल्याच घरात आपली अडचण होऊ लागते. ही जाणीव आयुष्य निस्तेज होण्यास कारणीभूत ठरते.
म्हातारपनाचा छापाकाटा सल " निर्माण करून जातो. आधार नसलेल्या फांदी सारखं आयुष्य जागून फांदी सुकून जाते. निर्माण करून जाते.. ती पोकळी ती उणीव.. जी कधीच भरून निघत नाही. .. !
_ सागर चव्हाण
Currently there are no reviews available for this book.
Be the first one to write a review for the book म्हातारपण.