You can access the distribution details by navigating to My pre-printed books > Distribution
₹ 267
मराठी वाचकांना भावेल अशी माहिती तंत्रज्ञानावरील वैज्ञानिक काल्पनिका कादंबरी सहजी उपलब्ध होत नव्हती. त्यांची मराठी कादंबरीची तृषा भागविण्यासाठी मु.सा.फि.र.चे प्रयोजन !
मु.सा.फि.र. ही आजच्या तरुण पिढीला भावेल अशी एक माहिती तंत्रज्ञानावर आधारित असलेली वैज्ञानिक काल्पनिका आहे.
दिल्लीतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये एम.बी.ए. शिकणाऱ्या मुला मुलींच्या ग्रुपपासून ही कथा सुरु होते. या ग्रुपमधील सर्वच मुले-मुली ही आपापल्या परीने हुशार आहेत. आजची तरुण पिढी राष्ट्रप्रेमाने झपाटलेली आहे. देशासाठी काहीतरी भव्य दिव्य करावे असे प्रत्येकाला वाटते. सुरुवातीला प्रेमकथेचे स्वरूप वाटणारी कथा, प्रत्येक पात्रांच्या योगदानाने वेगळी कलाटणी घेते. रजत या धाडसी पात्राच्या एंट्री नंतर कथा आणखी वेगळे वळण घेते.
वैज्ञानिक काल्पनिका या साहित्य प्रकारात अनेक उपप्रकार मोडतात. मु.सा.फि.र. ही मिलिटरी इंटेलिजन्सशी निगडीत असलेली कथा आहे. गोंधळाचे आणि दहशतीचे वातावरण निर्माण करून भारताच्या प्रगतीस खीळ घालण्याचे आंतरराष्ट्रीय अतिरेकी संघटनाचे इरादे, सौरभ, शिरीन आणि रजत त्यांच्या कुशाग्र बुद्धिमत्तेने उधळण्याचा प्रयत्न करतात. तसे करीत असतांना त्यांना निरनिराळ्या जीवघेण्या संकटांना सामोरे जावे लागते. आजची तरुण पिढी सर्व प्रकारची...
MU.SA.FI.R. is really a great science fiction ever read in Marathi.
The story keeps you reading till the end.The plot in the story is simply superb!!.
Ambiance of the places described in...
Re: मु.सा.फि.र. (e-book)
या कादंबरीचा preview वाचल्यानंतर मी पूर्ण पुस्तक वाचल्याशिवाय थांबूच शकले नाही. कथेतील गूढ रहस्य शेवटपर्यंत वाचकाला खिळवून ठेवते आणि कथेला रोचक बनवते. कथेची रचना आणि पात्रांची सांगड अतिशय उत्कृष्ट पद्धतीने...