You can access the distribution details by navigating to My Print Books(POD) > Distribution
श्रीअक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थांच्या वात्सल्याचा अति अद्भूत आधुनिक अनुभवांचे संकलन असणाऱ्या ग्रंथात आहे –
१) समर्थांच्या समाधी प्रसंगी यति वेषांत प्रत्यक्ष उपस्थित असणाऱ्या सत्पुरुषाच्या मुखकमलातून स्त्रवलेले समाधि वर्णन.
२) प्रत्यक्ष श्रीस्वामींनी सुचविलेले नांव ’समुद्र भरला आहे’ असणाऱ्या ग्रंथातील अनाम स्तोत्राचे सहस्त्रनाम.
३) श्रीदत्तकृपा व श्री स्वामी समर्था यांचा वरदहस्त असणाऱ्या घराण्यात १५० वर्षे पठणात असणारी श्रीदत्तात्रेयाष्टोत्तर शतनामावली, आशीर्वचन व जप
४) प. पू. वासुदेवानंद सरस्वाती टेंबे स्वामींचे शिष्य व गुर्जर प्रदेशात दत्तभक्ति प्रसारक पांडूरंगशास्त्री वाळीमे अर्थात सर्वांना सुपरिचित रंगावधुत यांच्या मनःचक्षुपुढे उभे राहून ’क्यों हमे भूल गये? असे स्वामींनी विचारल्यानंतर लेखीणीतून मूर्त झालेले श्रीस्वामींच्या चोवीस नावांचे स्तोत्र.
५) स्वामीमहिमा, समर्थाष्टक, ’तुम्हाविण त्राता’ करुणाष्टक, ’माझी देवपूजा’ गुरुचरित्रातील ओव्या, अवतरणिका आणि जोगवा. गुरुतत्तव आणि गुरुमंत्र व गुरूपदेश
६) आजमितीस शहनिशा शक्य आहे असे तर्कशुद्ध विचारसरणी असणाऱ्या मान्यवर प्रतिभावंतांचे अनुभव आणि लोकमान्य टिळकांसारख्या राष्ट्रीय नेत्याचे व स्वातंत्र्यवीर सावारकरांच्या विष्णुमहादेव भटांसारख्या सहकाऱ्याचे स्वप्नानुभव. एकूण बावीस (२२) गोष्टी – त्यात कुणाला कृपाप्रसादाचे ताट तर कुणाला सदेह दर्शन तर कुणाला स्वप्नात दवाखान्यात नेणे
७) स्वामींच्या शिष्याने आजोबास प्रसाद वस्तु दिली त्यामुळे किंवा आजोबाने नातवाला स्वामींच्या शिष्याच्या पायावर घातले यामुळे नास्तिक नातवाचा त्याच्या वयाच्या ७० वर्षापर्यंत त्याला कोणतीही जाणीव न देता सांभाळ करणे. साधु, महाराज याजविषयी तिटकारा असतानाही केवळ जीव देण्यापूर्वी श्रीस्वामींच्या मंदिरात चुकीने पाऊले वळली म्हणून त्या व्यक्तिचा उद्धार
८) भक्ताला मदत करण्याचा मुसलमान अधिकाऱ्यास आदेश. डोळ्यातील फुल नाहीसे करणे. भक्ताने ठासून सांगितल्यामुळे सहामहिन्यात प्रचिती. हरवलेली मुले सापडणे.
९) निर्जन मार्गावर लुना चालू करणे व वृद्धेचे चोरापासून संरक्षण करणे
१०) परिशिष्टात कुठे स्वामी मोरगांवचे महागणंपती असल्याचे मत तर कुठे स्वामींचे दत्त परंपरेतील स्थान. कुठे स्वामी वचनांचे स्पष्टीकरण तर कुठे ग्रंथातील विधानांचे पुष्टीकरण
उत्तर मिमांसाकारांच्यामते मुलाबाळांवर न विसंबता प्रत्येकाने स्वतःचा उद्धार स्वतः करावा
Currently there are no reviews available for this book.
Be the first one to write a review for the book Swami Mahatmya.