You can access the distribution details by navigating to My Print Books(POD) > Distribution
'पालवी' हा माझा पहिला काव्यसंग्रह. खरंतर, पहिली कविता लिहिली तेव्हा वाटलं देखिल नव्हतं पुढे कधी एक कवितासंग्रह छापण्याएवढ्या कविता हातून लिहिल्या जातील. मन, आयुष्य, निसर्ग हा या सर्व कवितांच्या केंद्रस्थानी आहे. या कवितांनी मला खुप काही दिलंय. कथा,ललित लेख, वैचारिक लेख लिहायला मला आवडतं पण प्रत्येकाला वाटतं, कधीतरी कविता आपणही लिहाव्या मला ही वाटायचं पण कधी कवितेतून व्यक्त होता येईल हे मी पडताळून पाहिलंच नव्हतं आणि जेव्हा कविता करायला सुरूवात केली तेव्हा मात्र कविता कधी जवळची झाली ते समजलंच नाही. जे कथा आणि लेख यातुन मांडताना शब्द अपुरे पडतात ते सगळंच कवितेतून मांडता येतं. या कवितांनी मला जितका आनंद दिलाय तितकाच तुम्हाला वाचताना मिळेल ही खात्री बाळगा.
Currently there are no reviews available for this book.
Be the first one to write a review for the book Palavi.