You can access the distribution details by navigating to My Print Books(POD) > Distribution
Also Available As
₹ 150
₹ 150
मु.सा.फि.र. (गुप्तहेर खात्याचा तिसरा डोळा)
नैनितालच्या मु.सा.फि.र.नं दिलेली ‘ क्लास वन क्लासिफाईड ’ श्रेणीची माहिती कॅप्टन आलोकला, ले. जन. शर्मांना दाखविण्याची घाई झालेली होती. ती माहिती त्यांच्यापर्यंत पोचविण्याआधीच त्याचा बळी गेला. गार्डियननं अशी कोणती कल्पनातीत भयंकर माहिती दिलेली होती, जी पाहताच कॅप्टन आलोकला आपला जीव गमवावा लागला ?
ले. जन. शर्मा, कॅप्टन आलोकच्या अपघाती मृत्यू ने व्यथित झाले होते. तो अपघाताच होता की घातपात ?
शिरीन आणि सौरभ हे कॉलेजचे विद्यार्थी केवळ योगायोगाने त्यांच्या हाती लागलेल्या डेटा बॉक्समुळे प्राणान्तिक संकटात सापडले होते.
असं काय रहस्य होतं त्या गुप्त माहितीत की, ज्याच्या हाती ती लागेल तो संकटात सापडत होता ? रजत, आणि अतिरेक्यांच्या टोळीचा म्होरक्या मि. एस. देखील त्या माहितीच्या मागावर होते. ती माहिती हाती नं लागल्यानं मि. एस.चं असं कोणतं नुकसान होणार होतं , की ज्यामुळे त्याला ती सगळ्यात आधी मिळविण्यासाठी त्याचा गुप्त आडोसा सोडून रणमैदानात उतरावंच लागणार होतं ? या सगळ्या पाठलागाचा शेवट सर्वांना कुठे नेणार होता ? शिरीन आणि सौरभने अजाणतेपणी विषारी डंखाच्या माश्यांचं मोहोळ डिवचलं होतं.
रजत त्यांची योग्यवेळी मदत करू शकेल ? ती माहिती आणखी किती जणांचे जीव घेईल ?........
Currently there are no reviews available for this book.
Be the first one to write a review for the book मु.सा.फि.र..