You can access the distribution details by navigating to My Print Books(POD) > Distribution

Add a Review

कालचक्र

Sunil Waikar
Type: Print Book
Genre: Science Fiction & Fantasy
Language: Marathi
Price: ₹276 + shipping
Price: ₹276 + shipping
Dispatched in 5-7 business days.
Shipping Time Extra

Description

भारतातील अनेक ॠषी मुनींनी निरनिराळे वैज्ञानिक शोध लावल्याचा उल्लेख आपणास आपल्या धर्मग्रंथात किंवा रामायण महाभारत सारख्या महाकाव्यात आढळतो. अशा वक्तव्यांवर आधुनिक वैज्ञानिक बरेचदा टीका करतांना आढळतात.ज्या गोष्टींना शास्त्रीय पुराव्यांसह सिद्ध करता येऊ शकत नाही अशा गोष्टी मिथक या वर्गवारीत मोडून त्या नाकारल्या जातात. इसविसनपूर्व इतिहासात डोकावून बघितल्यास आपणास एक प्रश्न नेहमीच पडतो की त्याकाळच्या भारतीय लोकांना खरेच एवढे आधुनिक ज्ञान होते काय? हे जर खरे मानले तर आपण असे म्हणावे काय की रामायण, महाभारत, भगवद्गीता हे ग्रंथ केवळ कविकल्पनांचा आविष्कार आहेत? रामायण, महाभारत वास्तवात घडून गेल्याचे अनेक पुरावे उपलब्ध आहेत.मग प्रश्न असा पडतो की त्याकाळी मानवास असलेले आधुनिक ज्ञान कोठे लोप पावले?काळाच्या ओघात ते ज्ञान कुठे नष्ट झाले असावे? त्याचा मागोवा कुठेच कां लागू शकत नाही? बरेचसे प्राचीन ज्ञान संस्कृत ग्रंथात असावे.असे ग्रंथ व ते ज्ञान भारतावर आक्रमण करणाऱ्या जेत्यांनी नष्ट केले असावेत असाही एक विचार प्रवाह आहे.नालंदा विश्वविद्यालयाच्या ग्रंथालयात बरेच दुर्मिळ ज्ञानग्रंथ होते असे देखील आपण वाचलेले आहे.त्या ग्रंथांचे आणि त्या ज्ञानाचे काय झाले?हा प्रश्न जेंव्हा पडतो तेंव्हा ते ग्रंथ तेथे अध्ययन करणाऱ्या परदेशस्थ अभ्यासकांनी पळविले असा विचार प्रवाह आहे.त्या ग्रंथालयास लागलेल्या आगेत उरलेले नष्ट करण्यात आले.
बरेच ज्ञान अद्भुत शम्बाला नगरीत आहे असे देखील दाखले आहेत.
शम्बाला विषयी अनेक ग्रंथात उल्लेख आढळतो. शम्बाला हे ज्ञानाचे भांडार आहे हे अनेक तत्त्वज्ञांना माहीत आहे.शम्बाला हे नेमके कुठे वसले आहे याबद्दल अनेक मते आहेत.
हाच विषय आणि उपलब्ध संदर्भ घेऊन कालचक्रची रचना केलेली आहे.या कथेत आपणास शम्बालाची देखील सफर घडणार आहे.
कालचक्र वाचतांना आपणास नक्कीच असे वाटावे की, खरेच असे असू शकते.याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.
कालचक्र ही एक अशी वैज्ञानिक कादंबरी आहे ज्यातील स्थाने,व्यक्ती आणि घटना यांना विज्ञानाच्या आधारावर पारखता येऊ शकतील.
आज सारे जग निरनिराळ्या ग्रहांवर जीवसृष्टी आहे काय? हे शोधण्यासाठी वेगवेगळे संशोधन करीत आहे.असे संशोधन करीत असतांनाच चंद्रावर मानवाने आपल्या पाऊल खुणा उमटवून पन्नास वर्षांहून अधिक कालावधी लोटला आहे.त्यानंतर मात्र मंगळावरील संशोधनाचा विचार केला तर आपण तितके पुढे गेलेलो नाहीत. भारतीय अंतराळ विज्ञान संशोधन संस्था,इस्रोने गत काही वर्षात नेत्रदीपक प्रगती केली आहे.मंगळावर मानवाने जाणे योग्य की अयोग्य ?याचा शोध या कादंबरीत घेतला आहे.
सुनील वाईकर

About the Author

Sunil Waikar was born in India and graduated as an Electrical Engineer in the state of Maharashtra. He worked with a renowned Electricity Distribution Company and retired in 2013. During his services, he maintained his passion for writing fiction. Sunil is an avid traveler and likes to spend time in the midst of nature.
The space thriller Kaalchakra was composed, during the lockdown. His other science fiction stories published to the date are:
गार्डियन नैनिताल -एका षडयंत्राचा शेवट.( सायन्स फिक्शन)
शोध अज्ञातांचा (स्पेस फिक्शन )
मध्यरात्रीचे धुके (गूढ रहस्य कथा)
Guardian -Fighting A Digital Conspiracy At Nainital
Rescue Blue Planet.

Book Details

Publisher: Sunil Waikar
Number of Pages: 222
Dimensions: 6"x9"
Interior Pages: B&W
Binding: Paperback (Perfect Binding)
Availability: In Stock (Print on Demand)

Ratings & Reviews

कालचक्र

कालचक्र

(Not Available)

Review This Book

Write your thoughts about this book.

Currently there are no reviews available for this book.

Be the first one to write a review for the book कालचक्र.

Other Books in Science Fiction & Fantasy

Shop with confidence

Safe and secured checkout, payments powered by Razorpay. Pay with Credit/Debit Cards, Net Banking, Wallets, UPI or via bank account transfer and Cheque/DD. Payment Option FAQs.