You can access the distribution details by navigating to My Print Books(POD) > Distribution
रहस्य सांकेतिक चिन्हांचे : ही एक काल्पनिक गूढ कथा आहे. सृष्टी सौंदर्याने नटलेल्या विक्रमगडमधील व्यंकटराव देसाई यांच्या पूर्वजांनी बांधलेल्या गावाबाहेरच्या पुरातन वाड्यात काही अघटीत घटना घडलेल्या असतात. त्यामुळे त्यांच्या आजोबांनी तो वाडा कायमचा सोडून दिलेला असतो. व्यंकटरावांच्या आजोबांनी त्यांना त्या वाड्याबद्दल एकाच वाक्यात सांगितलेले असते. ते असे की तो वाडा अशुभ आहे. त्यामुळे त्या वाड्यात अगदीच आणीबाणीची परिस्थिती उद्भवल्याशिवाय विनाकारण जायचे नाही. व्यंकटरावांनी आजोबांचा शब्द आयुष्यभर पाळलेला असतो.
व्यंकटरावांची नातवंडे दिवाळीच्या सुट्टीत विक्रमगडला येतात. गावातील त्यांच्या मित्रांच्या आग्रहास बळी पडून ते त्या गावाबाहेरील पुरातन वाड्याकडे जातात. पण....... ती मुलं वाड्यामध्ये जात नाहीत. व्यंकटरावांना कर्णोपकर्णी ते समजते. ते मुलांना रागावण्याऐवजी त्यांना त्या वाड्याचा ऐश्वर्य संपन्न इतिहास कथन करतात.
त्या वाड्यातील एका शयन कक्षात एक विचित्र पण आकर्षक आरसा बसविलेला आहे व त्यावर चित्र विचित्र चिन्हे ठसविलेली आहेत हे त्यांच्या कथनात येते.
आरसा आणि त्यावरील चिन्हांबद्दल ऐकून व्यंकटरावांच्या नातवंडांची वाड्यात जाण्याची उत्सुकता आणखी वाढते. त्यांची दिवाळीची सुट्टी संपते त्यामुळे ते विक्रमगडमधून आपल्या गावी परततात.
वाड्याबद्दल ऐकलेला ऐश्वर्यसंपन्न इतिहास ती मुले व्यंकटरावांच्या अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या इतर नातवंडांना सांगतात. त्यामुळे त्यांची देखील त्या आरशाबद्दल उत्सुकता वाढते.
ती सर्व भावंडे उन्हाळ्याच्या सुट्टीत विक्रमगडला एकत्र जमल्यावर गुपचूप पुरातन वाड्यात जाऊन तेथील आरसा व इतर चमत्कारिक वस्तू पाहण्याचे नियोजन करतात.
मग तेथून सुरु होतो त्यांचा नियतीने योजलेल्या न परतणाऱ्या मार्गावरील प्रवास......
आरशावरील सांकेतिक चिन्हांचे गूढ उकलण्यात ती मुले यशस्वी होतात काय????? ते उकलतांना त्यांना आणखी काय काय नवीन आश्चर्यजनक शोध लागतात??? त्यांच्यावर कोणती अघटीत संकटे येतात ????
याचे उत्तर वाचकांना कादंबरी वाचल्यावर मिळेल.
शेवटच्या क्षणापर्यंत उत्कंठा शिगेस पोहचविणारी ही गूढ कथा......... “रहस्य सांकेतिक चिन्हांचे” .
Currently there are no reviews available for this book.
Be the first one to write a review for the book रहस्य सांकेतिक चिन्हांचे.