You can access the distribution details by navigating to My Print Books(POD) > Distribution
एका तरुणाला त्याच्या स्वातंत्र्यसैनिक आजोबांवर पुस्तक लिहावंसं वाटतं, त्यासाठी तो बराच शोध घेतो, तेव्हा त्याला अनेक अप्रिय गोष्टींचा उलगडा होतो. अंतिमतः, त्याच्या समोर प्रश्न उभा राहतो – खऱ्या, पण कुटुंब-समाज यांना नकोशा असलेल्या गोष्टी पुस्तकात मांडायच्या का नाहीत?
विवेक कुलकर्णी लिखित ‘माधवराव एकंबीकर’ या कादंबरीचं हे थोडक्यात सूत्र. कोणत्याही मानवी समाजाकडे भूतकाळ आणि पर्यायाने इतिहास, परंपरा यांचा भलामोठा साठा असतो. आणि साठ्याचं उत्खनन केल्यास त्यातून एरवी न दिसणारे किंवा मुद्दाम दाखवले न जाणारे अनेक पैलू समोर येतात. असे पैलू स्वच्छ नजरेने पाहू शकणारा समाज सर्व दृष्टीने विकसित होण्याच्या दाट शक्यता असतात. फक्त प्रश्न असतो तो हा की, यासाठीची किंमत मोजायला तो समाज तयार आहे की नाही?
वर-वर पाहता ही कादंबरी एका तरुणाचा, त्याच्या आजोबांचं जीवन समजून घेण्याचा प्रवास अशी असली, तरी प्रतीकात्मक पातळीवर ती वरील प्रश्नाला भिडण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे सध्याच्या काळात हा प्रश्न अत्यंत नाजूक आणि बिकट होण्याच्या पार्श्वभूमीवर, ही कादंबरी महत्त्वाची ठरते.
- प्रणव...
Currently there are no reviews available for this book.
Be the first one to write a review for the book Madhavrav Ekambikar.