You can access the distribution details by navigating to My Print Books(POD) > Distribution
नमस्कार प्रिय वाचकांनो, मी योगेश बोरसे तुम्हा सर्वांचे बोरसे ग्रुपच्या सक्सेस मिशनमध्ये स्वागत करतो. आम्ही सादर करत आहे, मराठी बोधकथांचा संग्रह,
'एक होता विचार...'
या पुस्तकात, मी मानवी स्वभावाचे पैलू लक्षात घेऊन माझ्या दृष्टिकोनातून वाचकांपर्यंत माझे विचार पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे.
आयुष्यातील लहान-मोठ्या घटनांमधून जन्माला येणारे विचार, त्यातून निर्माण होणारे प्रश्न आणि त्यांची उत्तरे शोधण्याची धडपड, या सगळ्याला एक दिशा देण्याचा मानस यामागे आहे.
'एक होता विचार...' हे नावच सूचित करते की प्रत्येक मोठ्या बदलाची, प्रत्येक यशाची आणि प्रत्येक समाधानाची सुरुवात एका लहानशा विचारातून होते.
या कथा तुम्हाला केवळ विचारप्रवृत्त करणार नाहीत, तर तुमच्यातील सुप्त क्षमतांना जागृत करून जीवनातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी नवी ऊर्जा देतील.
हे पुस्तक वाचताना तुम्हाला कधी स्वतःचे प्रतिबिंब दिसेल, तर कधी इतरांचे अनुभव तुम्हाला मार्ग दाखवतील.
हा कथासंग्रह तुम्हाला नक्कीच आवडेल आणि तो तुमच्या मनात घर करेल, असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. यातील प्रत्येक कथा तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवेल आणि तुम्हाला यशाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी प्रेरणा देईल, अशी अपेक्षा करतो.
तुम्हाला हा कथांचा संग्रह नक्कीच आवडेल आणि आम्हाला खात्री आहे.
आपला,
लेखक-: योगेश वसंत बोरसे
Currently there are no reviews available for this book.
Be the first one to write a review for the book एक होता विचार...The Fact Behind Truth | मराठी प्रेरणादायक लेख | Ek Hota Vichar.