You can access the distribution details by navigating to My Print Books(POD) > Distribution
नमस्कार मित्रांनो :-
मी योगेश वसंत बोरसे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो.
डाळिंबाचे दाणे आणि नियती यांना लाभलेल्या उदंड प्रतिसादाने मी धन्य झालो .
धन्यवाद !
मित्रांनो असंच प्रेम कायम ठेवा .
अर्थात डाळिंबाचे दाणे भाग - १ आणि पुढील भाग २ म्हणजे नियती
आणि आता सादर आहे याच कथानकाचा पुढील आणि शेवटचा भाग - ३ - किमया -The Black Magic
मित्रांनो ,पहिल्या दोन भागांचे वैशिष्ट्य असे की या दोन्हीपैकी कुठला ही भाग तुम्ही अगोदर वाचू शकता नंतर दुसरा वाचला तरी त्यातील आनंद ,चार्म ,रहस्य , गूढता कायम राहते ...
कारण दोन्ही पुस्तकातील पात्र वेगळे असून त्यांच्या सामानंतर जीवनात घडलेल्या घडामोडी मुळे ते आयुष्याच्या वाटेवर एकत्र येतात आणि आयुष्य पुढे सरकते ... आपलं ही असंच होतं ना ... ?
आपल्या ही आयुष्यात किती व्यक्ती येतात आणि त्यांचं योगदान देऊन निघून जातात . काहींचा आपल्यावर आपल्या आयुष्यावर प्रभाव पडतो . कधी चांगला कधी वाईट !
इतका की आपलं आयुष्य बदलून जातं .. आणि आपण म्हणतो की ही व्यक्ती माझ्या आयुष्यात नसती आली तर .. ?
पण हेच जर - तर आपल्या हातात नसतं .कारण नियती आपले खेळ खेळत असते .हे जरी आपण नाकारलं तरी एक सत्य आपण नाकारू शकत नाही.
ते म्हणजे आपण समाजशील प्राणी आहोत . आपण समाजात राहतो म्हणूनच सुरक्षित ही आहोत आणि असुरक्षित ही ! जसे चांगल्या घटनांचे पडसाद आपल्यावर उमटतात तसे वाईट घटना ही आपले परिणाम सोडून जातात ..
आपण किती ही जागरूक राहिलो , अलर्ट राहिलो सावध राहिलो तरी यातून सुटका नाही ! किंबहुना आपण एकटे राहूच शकत नाही !
आयुष्याच्या एका वळणावर पोहोचल्यावर जेव्हा आपण मागे वळून बघतो तेव्हा आपल्याला समजतं, लक्षात येतं की हे सर्व असंच घडणार होतं किंवा आपण इथपर्यंत पोहोचावं म्हणून नियतीनेच हा डाव रचला होता . आणि आपण तेच आपलं प्रारब्ध समजून समाधान करून घेतो .
डाळिंबाचे दाणे मधील चंद्रशील ,इन्स्पेक्टर जोशी असोत की मिताली गोडबोले किंवा नियती मधील जयदेवराव ,मिलिंद ,दिनेश ,रमाकांत , अतुल ,साक्षी ,स्नेहा असोत . सर्वांना एका अलौकिक शक्तीने एकत्र आणलं त्यांचं प्रारब्ध घडवलं .
तुम्ही ही दोन्ही पुस्तके नक्की वाचली असतील . आता सादर आहे त्या पुढील कथानक :- किमया :- The Black Magic
किमया ,अर्थात जादू चमत्कार किंवा असं काही घडणं ज्याची आपण कल्पना ही करू शकत नाही !
तरी ही मी कल्पना करण्याचं धाडस करून ही काल्पनिक भयकथा - रहस्य कथा तुमच्या समोर सादर करतोय.
शेवटचा भाग असेल किंवा नियतीने काही किमया केली तर भविष्यात अजून पुढचे भाग ही निघतील ..
पुन्हा भेटूच !
चला तर " किमया - The Black Magic "
या कथेला प्रारंभ करूयात !
नियती मध्ये मिताली आत्महत्येपर्यंत पोहोचते आणि डाळिंबाचे दाणे मध्ये चंद्रशील तिला वाचवतो .
आणि मितालीचं लग्न मिलिंदशी लावायला लक्ष्मीबाई तयार होतात. पण इन्स्पेक्टर जोशींना यात काही गडबड असल्याचा संशय येतो .
मितालीच्या जीवाला धोका आहे ही खात्री त्यांना वाटते !
ती कितपत योग्य अयोग्य तसेच या दोन्ही कथांमध्ये निर्माण झालेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे या कथेतून अशा पद्धतीने सादर होतील की तुम्ही कल्पना ही करू शकणार नाही !
सूचना :- ही कथा ,पूर्णतः काल्पनिक असून यातील पात्रांची नावे घटना आणि स्थळांची नांवे ही कथानकाची गरज म्हणून घेतली आहेत . यातील कुठल्याही घटनेचा ,व्यक्तींचा ,घटनांचा जाणून बुजून उल्लेख केलेला नाही . निखळ मनोरंजन हाच एकमेव हेतू आहे !
Currently there are no reviews available for this book.
Be the first one to write a review for the book किमया.....डाळिंबाचे दाणे - भाग ३ | Kimaya...Dalimbache Dane-Part 3 | मराठी रहस्यमय भयकथा | Marathi Horror Storybook.