You can access the distribution details by navigating to My Print Books(POD) > Distribution
नमस्कार मित्रांनो -
मी योगेश वसंत बोरसे ,तुम्हा सर्वांचं BGSM PRODUCTION आणि BHUTATMA PUBLICATION मध्ये स्वागत करतो ... मित्रांनो सादर आहे तुमच्यासाठी रहस्यमय भयकथा - ' वांझ -THE BARREN '
हा विषय असा आहे की आपल्याला अस्वस्थ करतो ... जगाची लोकसंख्या किती ही वाढली ,परिस्थिती काहीही असली ,गरिबी असो ,श्रीमंती असो ,प्रत्येकाला आपलं मूल हवं असतं ... खास करून महिला वर्गाला त्याशिवाय पूर्णत्व लाभल्याचं समाधान मिळत नाही .
त्यांची मानसिकता ,सामाजिक दर्जा या मूलभूत बाबी वर अवलंबून असतो की मुलं किती ?
आणि पुरुषांपेक्षा या बाबतीत स्त्रिया जास्त संवेदनशील असतात , त्याच जास्त डिवचतात , त्या स्त्रियांना ज्यांना मुलबाळ नसतं ! मग सुरु होतो एक संघर्ष ! कधी ही न संपणारा ...
अर्थात पुरुषांना ही या समस्या येतात ,नाही असं नाही पण त्याची तीव्रता कमी असते ... पण जसं मूल व्हायला काही घटक ,घटना ,परिस्थिती ,शारीरिक क्षमता , अशा अनेक गोष्टी कारणीभूत असतात ,त्याचप्रमाणे मूल न व्हायला ही काही कारणं असतीलच की !
शारीरिक कमतरते व्यतिरिक्त इतर घटक ही कारणीभूत असले मग ? आपण आहे ती परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करतो . त्यासाठी मग काही ही करायची तयारी असलेली मानसिकता तयार होते ....
आणि जेव्हा आपल्या सोबत आपल्याला जे हवं तेच घडतं ,तेव्हा आपण ते मान्य करायला ही तयार नसतो ...
प्रचंड विरोधाभास !
थोडक्यात काय तर आपल्याला प्रत्येक गोष्ट ,प्रत्येक इच्छा आपल्या मनासारखी पाहिजे असते .. पण ती तशी नाही मिळाली तर ....
तर पुढे संघर्ष उभा राहतो आणि यात आयुष्य ,संसार आणि बरंच काही संपुष्टात येतं ... होत्याचं नव्हतं होऊन जातं ...
मित्रांनो , ही कथा काल्पनिक असली तरी वास्तवाशी निगडित असून यातील सर्व पात्रे ,प्रसंग ,व्यक्तिरेखा काल्पनिक आहेत .
फक्त मनोरंजन या हेतूने या कथेची निर्मिती मी केलेली आहे ,जी तुमच्या मनात घर करेल ,तुमच्या अनेक प्रश्नांची उत्तरे देईल आणि असंख्य नवीन प्रश्न उभे करेल ... अर्थात हा कथेचा पहिला भाग असून पुढील भाग लवकरच सादर होईल !
सूचना :-
मित्रांनो ही कथा लहान मुलांसाठी नाही !
कमजोर मनाच्या व्यक्तींसाठी नाही !
पेशंट साठी नाही !
फक्त ज्यांना घाबरायला आवडतं , भीती आवडते , आलेली संकटे पचवण्याची ज्यांची मानसिकता आणि क्षमता आहे .जे नैसर्गिक शक्तींवर विश्वास ठेवतात ,निसर्गाच्या निर्माण कार्यावरआणि विध्वंस प्रणालीवर विश्वास ठेवतात , त्यांच्या साठी ही भयकथा म्हणजे मेजवानी आहे !
तेव्हा कथेचा आस्वाद घ्या अगदी अथ पासून ते इति पर्यंत !
तुम्हाला ही भयकथा नक्की आवडेल याची खात्री आहे !
तर चला ,कथा वाचनाला सुरुवात करू या ..
आपला :- लेखक - श्री .योगेश वसंत बोरसे .
Currently there are no reviews available for this book.
Be the first one to write a review for the book वांझ....The Barren |Vaanjh...| Marathi Horror Storybook |Ghost Stories.