You can access the distribution details by navigating to My Print Books(POD) > Distribution
मित्रांनो नमस्कार - मी योगेश वसंत बोरसे तुम्हा सर्वांचं
' भुतात्मा पब्लिकेशन ' मधे,
BORSE GROUP SUCCESS MISSION मध्ये अर्थात BGSM PRODUCTION मध्ये स्वागत करतो.
सूचना : - ही भयकथा पूर्णतः काल्पनिक असून निखळ मनोरंजन हा एकमेव उद्देश आहे.
मित्रांनो माझ्या ' डाळिंबाचे दाणे ' या भयकथेला मिळालेल्या उस्फुर्त प्रतिसादा बद्दल शतशः धन्यवाद .
सादर आहे याच भयकथेचा पुढील भाग-
' नियती ' - डाळिंबाचे दाणे - भाग -2
मित्रांनो, आपलं आयुष्य अत्यंत अनपेक्षित आहे. अनाकलनीय आहे. आपल्या आयुष्यात अशा काही घटना घडतात ज्या आपलं आयुष्य प्रभावित करतात. आपलं आयुष्य बदलून टाकतात.
काही गोष्टी आपल्या कडून करवून घेतल्या जातात. कोण करवून घेतं ते ही आपल्याला माहित नसतं.
आपण किती ही विचार केला की हे असं का झालं ? आपण असं का केलं ? आपल्याच बाबतीत असं का घडलं ? तर याचं उत्तर आपण देऊ शकतो का ? नाही .
तर बऱ्याचदा आपल्याला ही धक्का बसतो.
आपलं बरंचसं आयुष्य निर्णय घेण्यात आणि निष्कर्ष काढण्यात जातं. आणि उत्तर मिळतं ' नियती ', दैव, आणि आपण जे परिणाम भोगतो ते आपलं 'प्रारब्ध', 'नशीब.'
कधी कधी हे अत्यंत भयानक पद्धतीने समोर येतं आणि आपण हतबल होतो. प्रारब्ध म्हणून स्वीकारतो. दैवाचे खेळ, नियतीचे डावपेच म्हणून शरण जातो....
शेवटी काय उरतं?
फक्त परिणाम, भयावह परिणाम - जे आपलं आयुष्य बदलून टाकतात. उध्वस्त करून टाकतात.
मित्रांनो –
ही भयकथा काल्पनिक असली तरी वास्तवाशी साधर्म्य असणारी आहे. कथेतील काही प्रसंग, घटना अंगावर येणाऱ्या आहेत.
तेव्हा सावधान-
कमजोर मनाच्या वाचकांसाठी ही कथा नाही. अर्थात डाळिंबाचे दाणे भाग-1 आणि हा भाग-2 कणखर मनाच्या वाचकांनीच वाचाव्यात. ज्यांना भीती आवडते. पचते, अशांना ही कथा नक्कीच आवडेल याची खात्री आहे.
तुमचा - विश्वासू –
लेखक :- योगेश वसंत बोरसे.
Currently there are no reviews available for this book.
Be the first one to write a review for the book Niyati...Dalimbache Dane - Part 2 | नियती... डाळिंबाचे दाणे - भाग २ ।.