You can access the distribution details by navigating to My Print Books(POD) > Distribution
मित्रांनो ,नमस्कार - मी योगेश वसंत बोरसे तुम्हा सर्वांचं भुतात्मा पब्लिकेशन {BGSM PRODUCTION - BORSE GROUP SUCCESS MISSION } मध्ये स्वागत करतो .
मित्रांनो आमच्या लहानपणी म्हणजे साधारण ८० ते ९० च्या दशकात मुलांचा बराचसा वेळ घराबाहेर खेळण्यात ,हुंदडण्यात जायचा . लपाछपी ,लंगडी ,लिंगोरच्या ,आबाधुबी ,स्टॅच्यू ,खोखो ,बॅट बॉल ,आंधळी कोशिंबीर ,असे अनेक खेळ खेळले जायचे .
तेव्हा घरं मोठी असायची ,वाडे असायचे ,चाळी असायच्या , चाळकरी असतील किंवा वाड्यातील लोकं असतील ,१० ते १५ कुटुंब असली तरी गुण्या गोविंदाने नांदायची . एकत्र राहायची . त्यामुळे मुलं ही सोबत असायची ,अगदी दिवसभर ,तर कधी कधी रात्रीपर्यंत .....
तर मित्रांनो अशीच ही एक कथा - एका खेळा पासून सुरु होणारी तरीही भयकथेचं स्वरूप आलेली , अत्यंत रोमहर्षक ,भयकथा !
तुम्हाला त्या काळात घेऊन जाणारी ! आणि गुंतवून ठेवणारी -
मित्रांनो ही भयकथा काल्पनिक असली तरी परिस्थितीचं साधर्म्य बाळगणारी आहे . यातील पात्र काल्पनिक असून ही आपल्या अवती...
Currently there are no reviews available for this book.
Be the first one to write a review for the book Statue | स्टॅच्यू... | भाग १ | Part- 1.