You can access the distribution details by navigating to My Print Books(POD) > Distribution
"पार्टनर" हे व.पु. काळे यांच्या गाजलेल्या मराठी कादंबरीचे नाट्यरुपांतर. महाराष्ट्र राज्य-नाट्य स्पर्धेत हे नाटक १९७७ मधे औरंगाबाद केंद्रातून सादर झाले आणि त्याला त्या केंद्रातून दुसरे पारितोषिक मिळाले. ह्या नाट्याविष्कारानंतर या कादंबरीचे तीन स्वतंत्र रंगाविष्कार झाले आहेत. पहिला स्वत: व.पुं.ची भूमिका असलेली नाट्यांबरी, दूरदर्शनवर आलेलं नाटक आणि नुकताच येऊन गेलेला चित्रपट. एकाच कथेचे हे असे चार स्वतंत्र अविष्कार होणारे हे दुर्मिळ उदाहरण होय.
****
Re: पार्टनर
व.पु. काळेंची पार्टनर ही कादंबरी १९७७ मधे प्रकाशित झाली. त्याच वर्षी औरंगाबादच्या "नाट्यरंग"ने महाराष्ट्र राज्य स्पर्धेत ह्या कादंबरीवर आधारीत नाटक रंगभूमीवर आणले. नाट्यरुपांतर डॉ. अशोक कुलकर्णी यांनी केले होते. प्रसिद्ध रंगकर्मी कुमार देशमुख, चंदू सोमण, नेत्रज्योती कुलकर्णी, अजित दळवी, जयश्री गोडसे, अनुया दळवी, आलोक चौधरी, अशोक कुलकर्णी यांनी त्यात भूमिका केल्या. कुमार देशमुख यांनी त्याचे दिग्दर्शन केले. प्रयोगाला औरंगाबाद केंद्रातून दुसरे पारितोषिक मिळाले. कुमार देशमुख यांना अभिनयाचे पारितोषिक मिळाले.
मुळात व.पुं.ची भाषा आणि कसलेले कलाकार यामुळे प्रयोग रंगला. फ्लॅशबॅक तंत्र, लेव्हल्सचा वापर करून अनेक ठिकाणी घडणारे प्रसंग सादर होणे आणि आलोक चौधरीची प्रकाश योजना यामुळे नाट्काचा सुविहित प्रयोग झाला. यानंतर खुद्द व.पुंनी "नाट्यांबरी" स्वरूपात याचे प्रयोग केले. दूरदर्शनवर ही ह्याचा प्रयोग स्वतंत्रपणे सादर झाला. नुकताच या कादंबरीवर चित्रपट देखिल येऊन गेला आहे.