You can access the distribution details by navigating to My Print Books(POD) > Distribution
रामायणात रावणाची पत्नी आणि लंकेची महाराणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मंदोदरीच्या स्वतःच्या आयुष्याची कथा मात्र फारशी सांगितली गेली नाही.
ती कोण होती? तिचे बालपण कसे होते? रावण तिच्या आयुष्यात कसा आला? वैभवाच्या शिखरावर असलेल्या लंकेच्या विनाशाची चाहूल तिला कधी लागली? आणि पतीवरील प्रेम, राजधर्म, मातृत्व आणि स्वतःची सदसद्विवेकबुद्धी यांच्यात अडकलेल्या या स्त्रीने सर्वनाशाला कसे सामोरे गेले?
‘मंदोदरी : एक निःशब्द कहाणी’ ही केवळ रावणाच्या पत्नीची कथा नाही.
ही एका बुद्धिमान स्त्रीची, एका पत्नीची, एका आईची आणि एका साम्राज्ञीची कथा आहे, जिला इतिहासाने ओळख दिली, पण स्वतःचा आवाज फारसा दिला नाही.
रामायणाच्या परिचित कथेकडे मंदोदरीच्या नजरेतून पाहण्याचा हा एक वेगळा प्रयत्न.
Currently there are no reviews available for this book.
Be the first one to write a review for the book मंदोदरी.