You can access the distribution details by navigating to My Print Books(POD) > Distribution
सुमारे वीस-पंचवीस हजार वर्षांपूर्वीची एक समृद्ध आणि विकसित संस्कृती. तिन्ही दिशांना सागराने वेढलेली भूमी. राजवंश, ऋषी, योद्धे आणि ज्ञानपरंपरांनी समृद्ध असलेल्या त्या विस्मृतीत गेलेल्या जगात उलगडते रेणुकेची असामान्य जीवनगाथा.
बलाढ्य आणि प्राचीन इक्ष्वाकु कुलात जन्मलेली रेणुका, एक राजकन्या. अगणित महारथी, योद्धे आणि चक्रवर्ती सम्राटांना नाकारून ती निष्कांचन ऋषीस वरते. राजप्रासादातील वैभव मागे सोडून सुरू झालेला तिचा प्रवास तिला ऋषींच्या आश्रमांपासून अरण्यांपर्यंत, हिमालयाच्या दुर्गम प्रदेशांपासून नर्मदेच्या तीरापर्यंत घेऊन जातो.
अतुलनीय ज्ञान आणि प्रखर बुद्धिमत्तेचे धनी असलेले जमदग्नि, एक सप्तर्षी, ज्यांच्या कृतींचा आणि विचारांचा युगानुयुगे विपर्यास होत राहिला.
आणि त्यांचा मातृपितृप्रेम आणि भक्तीने भारावलेला असा पुत्र रामभद्र; ज्याच्या प्रतिशोधाच्या ज्वालेत अनेक बलाढ्य योद्धा कुळांचा विनाश झाला आणि जो पुढे परशुराम म्हणून चिरस्मरणीय ठरला.
पण ही केवळ एका राजकन्येची, ऋषीची किंवा पराक्रमी पुत्राची कहाणी नाही. ही आहे एका स्त्रीच्या परिक्रमेची कथा. प्रेम आणि विरहाची, मातृत्व आणि कर्तव्याची, संघर्ष आणि त्यागाची; प्रतिकूलतेतही आपल्या तत्त्वांशी आणि श्रद्धेशी तडजोड न करणाऱ्या एका विलक्षण स्त्रीची गाथा.
रेणुका: एक परिक्रमा ही पुराणकथा नाही. प्राचीन इतिहास आणि मानवी भावभावनांच्या धाग्यांनी विणलेली ही एक कादंबरी आहे. एका राजकन्येच्या असामान्य प्रवासाची, जी आपल्या कर्तृत्वाने लोकमानसात देवीच्या स्थानी विराजमान झाली.
Currently there are no reviews available for this book.
Be the first one to write a review for the book रेणुका.