You can access the distribution details by navigating to My Print Books(POD) > Distribution
Also Available As
₹ 100
₹ 100
हे पुस्तक नर्मदा वाहन परिक्रमेबद्दल थोडक्यात मार्गदर्शक आहे.
या पुस्तकात नर्मदा वाहन परिक्रमा म्हणजे काय, ती कशी करायची, कुठले नियम पाळायचे, बरोबर काय वस्तू न्यायच्या, कुठला मार्ग वापरायचा, तसेच काही महत्वाचे कॉन्टॅक्टस यांची माहिती दिलेली आहे.
मंदिरं,त्यांचं आर्किटेक्चर,देवदेवतांच्या सुंदर मूर्ती,घाट,निसर्ग यांचे सुंदर फोटो, जणू काही आपणच परिक्रमा करत आहोत असं वाटायला लावणारं लाईव्ह प्रवासवर्णन,अनुभव आणि ठिकाणांची त्यांच्या पौराणिक कथांसह माहिती,परिक्रमा मार्ग,नियमावली, एजंट्स आणि प्रवासखर्च - थोडक्यात परिक्रमा करण्यासाठी लागणारी इच्छाशक्ती आणि आत्मविश्वास निर्माण करणारं , भीती घालवणारं आणि पुढचं पाऊल उचलायला लावणारं हे पुस्तक आहे.
तसेच लेखकाने स्वतः केलेल्या नर्मदा वाहन परिक्रमेची दैनंदिनी दिली आहे-ज्यामुळं वाचकांना प्रत्यक्ष परिक्रमा केल्याचा अनुभव तर येईलच पण त्याचबरोबर स्वतःला जेव्हा परिक्रमा करायची आहे त्यासाठी यातील बऱ्याच गोष्टी अंमलात आणता येतील.
सर्वात महत्वाचं म्हणजे या परिक्रमेतून मिळणारी अध्यात्मिक अनुभूती, मनःशांती याचा अनुभव परिक्रमा न करताही घेता येईल, अशी आशा आहे.
Currently there are no reviews available for this book.
Be the first one to write a review for the book नर्मदे हर : जीवन भर.