You can access the distribution details by navigating to My Print Books(POD) > Distribution

Add a Review

नर्मदे हर : जीवन भर

वाहन नर्मदा परिक्रमा अनुभव आणि मार्गदर्शिका
नितीन श्रोत्री
Type: Print Book
Genre: Religion & Spirituality
Language: Marathi
Price: ₹178 + shipping

Also Available As

This book ships within India only.
Also Available As
Price: ₹178 + shipping
Dispatched in 5-7 business days.
Shipping Time Extra

Description

हे पुस्तक नर्मदा वाहन परिक्रमेबद्दल थोडक्यात मार्गदर्शक आहे.
या पुस्तकात नर्मदा वाहन परिक्रमा म्हणजे काय, ती कशी करायची, कुठले नियम पाळायचे, बरोबर काय वस्तू न्यायच्या, कुठला मार्ग वापरायचा, तसेच काही महत्वाचे कॉन्टॅक्टस यांची माहिती दिलेली आहे.
मंदिरं,त्यांचं आर्किटेक्चर,देवदेवतांच्या सुंदर मूर्ती,घाट,निसर्ग यांचे सुंदर फोटो, जणू काही आपणच परिक्रमा करत आहोत असं वाटायला लावणारं लाईव्ह प्रवासवर्णन,अनुभव आणि ठिकाणांची त्यांच्या पौराणिक कथांसह माहिती,परिक्रमा मार्ग,नियमावली, एजंट्स आणि प्रवासखर्च - थोडक्यात परिक्रमा करण्यासाठी लागणारी इच्छाशक्ती आणि आत्मविश्वास निर्माण करणारं , भीती घालवणारं आणि पुढचं पाऊल उचलायला लावणारं हे पुस्तक आहे.
तसेच लेखकाने स्वतः केलेल्या नर्मदा वाहन परिक्रमेची दैनंदिनी दिली आहे-ज्यामुळं वाचकांना प्रत्यक्ष परिक्रमा केल्याचा अनुभव तर येईलच पण त्याचबरोबर स्वतःला जेव्हा परिक्रमा करायची आहे त्यासाठी यातील बऱ्याच गोष्टी अंमलात आणता येतील.

सर्वात महत्वाचं म्हणजे या परिक्रमेतून मिळणारी अध्यात्मिक अनुभूती, मनःशांती याचा अनुभव परिक्रमा न करताही घेता येईल, अशी आशा आहे.

About the Author

नितीन हे एक ऑटोमोबाईल्समध्ये रस असणारे मेकॅनिकल इंजिनियर आणि एम.बी.ए. आहेत. ऑटोमोटिव्ह उद्योगात प्रामुख्यानं आर.अँड डी., मार्केट रिसर्च, प्रोजेक्ट आणि प्रॉडक्ट मॅनेजमेंट या क्षेत्रांत टाटा मोटर्स आणि महिंद्रासारख्या कॉर्पोरेट्समध्ये २५ वर्षांहून अधिक काळ व्यतीत केल्यानंतर त्यांनी उत्पादन निर्मितीच्या कलेत प्रावीण्य मिळवलेलं आहे.
स्वतंत्रपणे काम करण्याची इच्छा आणि मिळवलेलं ज्ञान इतरांना वाटण्याची आवड या उद्देशांनी त्यांनी २०१८ साली क्वांटम लीप कन्सल्टंट्स
(www.quantumleapconsultants.in) ही स्वत:ची सल्लागार कंपनी (कन्सल्टिंग फर्म) सुरू केली.
ही त्यांची व्यावसायिक बाजू आहे तर वैयक्तिक पातळीवर त्यांना गिर्यारोहण , प्रवास , छायाचित्रण, पक्षी निरीक्षण , बागकाम, गायन, संगीत ऐकणं , क्रिकेट आणि चित्रपट पाहणं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पुस्तक वाचन आणि लेखन हे छंद आहेत.
ते प्रामुख्यानं प्रेरणादायी व्यक्तिमत्वं, चित्रपट समीक्षा, प्रवासवर्णन, ऐतिहासिक घटना याबद्दल लिहितात.
ते त्यांची आई शैला, पत्नी सौ.संपदा (ज्या शिक्षिका आहेत) आणि मुलगा आदित्य यांच्यासोबत पुण्यात राहतात.
नियतकालिकांमध्ये लेख लिहिण्याची, विविध तंत्रज्ञान विषयक मंचांवर बोलण्याची आणि मॉडरेट करण्याची त्यांना आवड आहे जिथे ते आपला अनुभव आणि ज्ञान, उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्राबरोबर सामायिक करतात.
त्यांचा असा विश्वास आहे की एखाद्या उत्पादनाप्रमाणं प्रत्येक व्यक्ती एक वेगळेपण / अद्वितीय मूल्य प्रस्ताव (युनिक सेलिंग प्रपोझिशन) प्रस्थापित करू शकते आणि असं करणं अत्यावश्यक आहे. एखाद्याच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये कौशल्यं विकसित करून अशी मूल्यं विकसित केली जाऊ शकतात.
भारतीय संस्कृती आणि मूल्यं यांच्यावर त्यांचा गाढ विश्वास असून ते स्वतः श्रीमद्भागवत आणि श्रीमदभगवद्गीता यांचं मनापासून अनुसरण करतात.

Book Details

Publisher: नितीन श्रोत्री
Number of Pages: 118
Dimensions: 5.5"x8.5"
Interior Pages: B&W
Binding: Paperback (Perfect Binding)
Availability: In Stock (Print on Demand)

Ratings & Reviews

नर्मदे हर : जीवन भर

नर्मदे हर : जीवन भर

(Not Available)

Review This Book

Write your thoughts about this book.

Currently there are no reviews available for this book.

Be the first one to write a review for the book नर्मदे हर : जीवन भर.

Other Books in Religion & Spirituality

Shop with confidence

Safe and secured checkout, payments powered by Razorpay. Pay with Credit/Debit Cards, Net Banking, Wallets, UPI or via bank account transfer and Cheque/DD. Payment Option FAQs.