You can access the distribution details by navigating to My Print Books(POD) > Distribution
एखाद्याचं प्रेम रंगणार असेल तर त्याला कोणीही थांबवू शकत नाही, असं म्हणतात. नियतीचा हा खेळ अजब प्रकारे चालूच असतो. घडणाऱ्या घटना आणि अंतरातील बदलणारे भाव यांचा अजब मिलाप कधीकधी पहावयास मिळतो; आणि अधुऱ्या प्रेमाची पुर्तता करण्यासाठी दोन जीवांची जन्मोजन्मी गाठ पडत असावी, असं वाटतं.
ती ऐश्वर्याचा उपभोग घेणारी युवती असते; तर तो तिच्या येथे चाकरी करणारा भोळसट युवक असतो. तिचं प्रदोष व्रत आणि त्याची भेट याला एकाच दिवशी सुरुवात होते; आणि अपशकुनांच्या घटना घडताना त्यांच्या प्रेमाचा खडतर पण गुलाबी प्रवास सुरु होतो.
तिच्या प्रेमाचे रंग बदलत असताना तीही अनाहूतपणे बदलत असते. तिचे निर्णय आत्मघातकी ठरत असतात. चाललेला प्रकार त्याच्या विचारापलीकडला असतो; तरीही तो प्रत्येक गोष्टीत तिची साथ देतो.
आणि, एक क्षण ज्याला प्रेमाची पुर्तता किंवा पुनर्जन्म याला ते येऊन पोहोचतात.
...
Currently there are no reviews available for this book.
Be the first one to write a review for the book हिंदोळा (मराठी दिर्घकथा संग्रह) (भाग १३ - "सप्तपदी") (रंग १ - "आश्चर्य").