You can access the distribution details by navigating to My Print Books(POD) > Distribution
श्री. सिद्धार्थ भिंगारकर यांच्या मते "मराठीतील हे संशोधन केवळ आकडेवारी नाही, तर महागाईच्या चक्राचा आरसा आहे..."
महागाई ही केवळ वाढती किंमत नसून, ते सामान्य माणसाच्या जगण्यावर परिणाम करणारे एक गुंतागुंतीचे चक्र आहे. प्रस्तुत पुस्तकात लेखकाने सरकारी आणि जागतिक स्तरावरील दुय्यम आकडेवारीचे (Secondary Data) सखोल आणि संशोधनात्मक विश्लेषण केले आहे. महागाईच्या कारणांपासून ते त्याच्या दूरगामी परिणामांपर्यंतचा प्रवास लेखकाने पुराव्यांसह मांडला आहे. या संशोधनात्मक पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे, याची जागतिक स्तरावर दखल घेतली गेली असून, मुंबईस्थित आंतरराष्ट्रीय सल्लागार व ६००० हून अधिक पोलीस आणि सुरक्षा दलांचे जागतिक मार्गदर्शक. अर्थकारण आणि राजकारणाचे गाढे अभ्यासक श्री. सिद्धार्थ भिंगारकर यांनी या संशोधनाला 'मराठीतील एक दिशादर्शक दस्तऐवज' म्हणून गौरविले आहे. अर्थशास्त्राचे विद्यार्थी, धोरणकर्ते आणि देशाच्या अर्थव्यवस्थेत रस असणाऱ्या प्रत्येक जागृत नागरिकासाठी हे पुस्तक एक अनिवार्य मार्गदर्शक ठरेल.
Currently there are no reviews available for this book.
Be the first one to write a review for the book महागाईचा विळखा: २०११-२०२१ दशकाचे आर्थिक सत्य.