You can access the distribution details by navigating to My Print Books(POD) > Distribution
चिंतनाच्या वाटेने: स्व, समाज आणि आधुनिक जगाचा वेध
हे पुस्तक म्हणजे केवळ चाळीस लेखांचा संग्रह नाही, तर चाळीस दिवसांचा आत्म-संवाद आहे. आयुष्याकडे बघण्याचे चाळीस वेगवेगळे आरसे आहेत.
मालेगावचा तरुण लेखक राघव जोशी याचे हे दुसरे ई-बुक. इतिहास, अर्थकारण, राजकारण, शिक्षण, विज्ञान आणि तत्त्वज्ञान अशा विविध विषयांवरील सखोल अभ्यास आणि चिंतनाचा प्रत्यय या लेखांतून येतो.
या पुस्तकाचा उद्देश उत्तरे देणे नाही, तर प्रश्न विचारणे आहे. कारण उत्तरे काळानुसार बदलतात, पण चांगला प्रश्न आयुष्यभर सोबत राहतो.
मी कोण आहे? यश म्हणजे काय? कृत्रिम बुद्धिमत्तेनंतर माणूस उरेल का? अशा प्रत्येकाच्या मनात घोंगावणाऱ्या प्रश्नांशी केलेली ही मैत्री आहे.
काही लेख तुम्हाला अस्वस्थ करतील, काही कवटाळतील, तर काही विचार करायला लावतील. AI आणि नैतिकता, भारतीय पालकत्व, अहं, आणि ग्लॅमरची दुनिया - या वेगवान जगात आपण 'तगत' आहोत की 'जगत' आहोत, याचा हा जागरूक शोध आहे.
Currently there are no reviews available for this book.
Be the first one to write a review for the book चिंतनाच्या वाटेने.