You can access the distribution details by navigating to My Print Books(POD) > Distribution
माझ्या बालपणी आमच्या कौटुंबिक घरी श्रीपत बावकर नावाचे गृहस्थ घरकामासाठी दिवसभर असायचे. हसरा चेहरा, मिश्किल स्वभाव व हजरजबाबीपणा या सोबत कोणत्याही विषय वा शब्दावरून पटकन चारोळया रचण्यात ते पटाईत होते.
बालपणी मला त्यांचा कौतुक मिश्रित हेवा वाटत असे. कालांतराने कळत- नकळत मी सुद्धा त्यांचे अनुकरण करीत, यमक जुळवून दोन ओळया लिहीण्याचा प्रयत्न करू लागलो.
माझा दिवंगत मित्र वसंत भोई हा उत्कृष्ट चित्रकार तर होताच शिवाय तो कविताही छान करीत असे. मित्र या नात्याने तो मला कविता वाचून दाखवीत असे. मी सुद्धा जमेल तसे काव्यलेखन करावे असे वसंतास मनोमन वाटत असल्याकारणे तो नेहमी मला कविता लिहिण्यास उद्युक्त करीत असे.
या व्यतिरिक्त माझे वडील बंधू श्री. त्र्यंबकेश (आप्पा) हे सुद्धा मला नियमित प्रोत्साहन व मार्गदर्शन देऊन प्रेमळ आग्रह करीत असे.
या घटनांची फलश्रुती म्हणजेच हा काव्यसंग्रह!
Currently there are no reviews available for this book.
Be the first one to write a review for the book शब्द फुलांची ओंजळ (Shabd Phulanchi Onjal).