You can access the distribution details by navigating to My Print Books(POD) > Distribution

Add a Review

Kavita manatlya

Prem, paus ani barach kahi...
Sonali Dorge-Phule
Type: Print Book
Genre: Poetry
Language: Marathi
Price: ₹199 + shipping
This book ships within India only.
Price: ₹199 + shipping
Dispatched in 5-7 business days.
Shipping Time Extra

Description

Kavita Manatlya is a Marathi poem book on life, love, friendship, romance, nature, inspiration and emotions. Poems are paintings of words. Find yourself in this book. You will definitely love it.
Don’t wait any longer! Click the buy button on a given link to begin the journey to the body of your dreams!!

**कविता मनातल्या - हृदयस्पर्शी कवितासंग्रह चला कविता वाट पाहतायेत **
तरुणांसाठी, गृहिणींसाठी, सर्वांसाठी.....
जेव्हा कवितेत आपण सापडतो, तेव्हा आपल्यातली कविताही सापडते आपोआप. चला तर मग थोडं थांबूया, विसावा घेऊया, आनंद लुटुया जगण्याचा. तुम्ही, कविता, भावना आणि आठवणी काय मस्त कॉम्बिनेशन आहे. स्वतःजवळ येण्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे पुस्तक, कविता आणि कविता मनातल्या!

हे पुस्तक का वाचावं

* प्रेम, पाऊस, मैत्री, आयुष्य साजरं करण्यासाठी
* स्वतःजवळ येण्यासाठी
* रोजच्या धावपळीच्या आयुष्यात विसाव्याच्या क्षण शोधण्यासाठी
* तुम्हाला हवी असलेली सोबत, आधार, स्फूर्ती, दिशा मिळवण्यासाठी
* कवितेच्या दुनियेची सुंदर सफर करण्यासाठी
* अजूनही खूप काही सापडेल त्याचा शोध घेण्यासाठी

**एक झलक**
काही निवडक ओळी माझ्या कवितांमधून डोकावतायेत, तुम्हाला बोलावतायेत

जेव्हा अवखळ लाजरी ती प्रेमात काठोकाठ बुडते पण अजूनही व्यक्त झाली नाही तिच्या मनी हीच भावना दाटते
सोनेरी प्राजक्ताचा सडा
न जाणो मांडतोय कोणती रांगोळी ?
सुगंधात गहिऱ्या पाठवितो बोलावणी 
मागतो, फक्त तुझ्याच समंजस ओंजळी 

आणि तो प्रेम नक्की काय असतं हे शोध शोध शोधणारा, ठिकठिकाणी चाचपून पाहणारा जेव्हा जाणतो खऱ्या प्रेमाची अनुभूती तेव्हा हेच म्हणतो
तुझ्या डोळ्यात पाहिलं आणि परत येऊ नाही शकलो
आताकुठे प्रेम समजलो मला मी सापडलो

पावसावरच्या कवितांमधून डोकावणाऱ्या काही ओळी…..

पावसातल्या आपण आणि आपल्यातला पाऊस
समजून घ्यायचा असतो मनसोक्त जगायचा असतो

हाच का तो माझा स्वतःचा हक्काचा पाऊस ?
ज्याने माझा अश्रूसुद्धा नेला हिसकावून

नंतर फक्त त्याचा आवाजच येतो
एकदा गेलो तर पुन्हा नाही यायचो
आता मात्र मी लंगडतच गच्चीत जाते
अन त्याची मिठी मला पुरती घेरून टाकते 

आयुष्यावरच्या कवितांमधून येणाऱ्या काही ओळी …

आयुष्यच पुस्तक छोटं असतं,
प्रेमाचं पान मात्र अमर असतं
तेच सुरवात अन तेच शेवट असतं

ठरव आता स्वतःसाठीपण जगायचं
दुसर्यांसोबत स्वतःलापण जपायचं 
स्वतःबरोबर आयुष्यभर चालायचं असतं
म्हणूनच स्वतःला कधी विसरायचं नसतं

सुरवात करूया एका सुंदर प्रवासाला! आपल्या मैत्रीला!!
Don’t wait any longer! Scroll up and click the buy button to begin the journey to the body of your dreams!!

About the Author

Hi, I am Sonali Ajit Phule, from Pune, Maharashtra. I have completed my Masters in Library and Information science from Pune University. Writing is my passion and love to express with poems. This is my first poetry book. You will definitely love it. Your satisfaction is the biggest compliment for me.

मी सोनाली अजित फुले पूर्वाश्रमीची सोनाली दोरगे. मूळ पुण्याचीच जन्म, शिक्षण, माहेर, सासर सारं पुण्याचंच. माझं पदव्युत्तर शिक्षण MLISc मध्ये झालेलं असून मी UGC NET आणि SET उत्तीर्ण आहेत. गेले काही वर्ष दक्षिण कोरिया मध्ये माझ्या कुटुंबासोबत वास्तव्य करीत आहे. कवितेतून व्यक्त होण्याचं सुख अवर्णनीय आहे, सर्वोच्च आहे.लग्न होऊन पत्नी झाल्यावर, आई झाल्यावर, आता दुसऱ्या देशात वास्तव्य करताना आपला दृष्टिकोन अजून व्यापक झाल्याचा जाणवलं. कोणी एके क्षणी वाटलं आपल्याकडे जो कवितांचा साठा आहे तो मित्र मैत्रिणींपुरता मर्यादित न ठेवता सर्वाना खुला करून द्यावा. त्यातून एखाद्याला स्फूर्ती, विसावा, समाधान, आनंद मिळाला तर हि किती चांगली गोष्ट ठरेल! आणि या विचारातूनच हे पुस्तक लिहिण्याचा निर्णय घेतला.
माझा हा प्रयत्न तुम्हाला सुखावेल अशी खात्री आहेच मला. कविता वाचताना तुमच्या चेहऱ्यावरचं मधाळ हास्य आणि डोळ्यात उमटलेले भाव माझ्यासाठी सर्वोत्तम पावती आहेत. या पुस्तकाच्या माध्यमातून तुमची माझी भेट होत आहे आणि आपली मैत्रीही.

Book Details

ISBN: 9789389147667
Publisher: Independent
Number of Pages: 82
Dimensions: 6"x9"
Interior Pages: B&W
Binding: Paperback (Perfect Binding)
Availability: In Stock (Print on Demand)

Ratings & Reviews

Kavita manatlya

Kavita manatlya

(Not Available)

Review This Book

Write your thoughts about this book.

Currently there are no reviews available for this book.

Be the first one to write a review for the book Kavita manatlya.

Other Books in Poetry

Shop with confidence

Safe and secured checkout, payments powered by Razorpay. Pay with Credit/Debit Cards, Net Banking, Wallets, UPI or via bank account transfer and Cheque/DD. Payment Option FAQs.