You can access the distribution details by navigating to My Print Books(POD) > Distribution
सत्तू भोसले हा पहिला वारणेचा वाघ – पीडितांचा व आयाबहिणींचा त्राता आणि स्वातंत्र्यपूर्व काळात आपल्या गनिमी काव्याने ब्रिटिशांना जेरीस आणणारा. अण्णाभाऊ साठ्यांनी कादंबरी लिहून आणि नंतर शामराव मानेंनी सिनेमा काढून त्याला अमर केले. १९५०-६० च्या दशकांनंतर वारणा नदीच्या खोऱ्यात नव्या, आधुनिक जातीच्या वाघांचे एक अभयारण्यच जणू उदयास आले. त्याचे नाव वारणानगर. या अद्भुत नगरीत राहाणारा प्रत्येक जण वाघ, वाघीण किंवा बछडा होता. या सर्वांचे या वारणेच्या खोऱ्यावर निरतिशय प्रेम होते. त्यांनी आपापल्या परीने वारणानगरला जगाच्या नकाशावर आणले. वारणानगरच्या या सुवर्णकाळात लेखकाने अगदी जवळून पाहिलेल्या काही निवडक वाघांच्या व्यक्तिरेखांचा आणि लेखकाच्या आठवणींचा हा संग्रह.
Currently there are no reviews available for this book.
Be the first one to write a review for the book Waraneche (Kahi) Wagh.