You can access the distribution details by navigating to My Print Books(POD) > Distribution
ग्रामीण भागातील जीवन आणि तेथील वेग-वेगळे सन, उत्सव, परंपरा यांच्यातील समतोलावरील हि कथा आहे. या कथेचा सबंध हा माझ्या बालपणाशी आणि माझ्या कुटुंबातील गोष्टींशी मिळता जुळता आहे. माझ्या परिवारात केली जाणारी शेतातील ‘रास’ आणि त्यातून निर्माण झालेले बालप्रश्न, मी या लेखाच्या माध्यमातून जगासमोर आनत आहे. गावाच्या ठिकाणी अनेक अश्या काळानुरूप चालत आलेल्या रूढी परंपरा आजही आपल्याला पाहायला मिळतात. त्या गोष्ठी आपण पाहिल्यावर आपल्याला काहीतरी नवल असल्यासारखे वाटते. आपल्याला त्या आवडू लागतात. काही अश्या रूढी परंपरा असतात ज्या त्रासदायक असतात काही मनाला न पटणाऱ्या असतात. त्या परंपरा काळानुसार बदलत जातात. मात्र त्यातील उद्देश मात्र हा कधीच बदलत नाही. अश्याच एका परंपरेची गोष्ट घेऊन मी तुमच्यासमोर येत आहे. कुठल्याही गोष्टीचा बदल हा स्वताहून होत नसतो त्यासाठी भौतालची परीस्थिती हि कारणीभूत असते. तसेच वर्षानुवर्षे चालत आलेल्या रूढी परंपरा या सुध्दा भौतालच्या परीश्तिथीनुरूप बदलतात. याच बदलणाऱ्या परीस्थितीवर हि गोष्ट आधारित आहे. हि कथा एका ग्रामीण घराण्याची, मुलाची आणि त्या भोवतालच्या परिस्तिथीशी जोडले गेलेली आहे. तेथील रूढी परंपारा आणि दैनंदिन जीवन यांच्या आधारावर लिहीली गेली आहे. या कथेतील सर्व पात्र हे त्या कथेनुरूप तयार केलेले आहेत. वास्तवाशी या गोष्टीचा थोडाफार संबंध येऊ शकतो परंतु हि कथा कुठल्याही वास्तवाचे वर्णन करत नाही. हि कथा वाचत असताने तुम्ही गावाकडचे जीवन नक्की अनुभवाल याची मी खात्री देतो.
Currently there are no reviews available for this book.
Be the first one to write a review for the book रास.