You can access the distribution details by navigating to My Print Books(POD) > Distribution

Add a Review

रास

कथा परंपरेची - प्रेमाची - नात्यांतील गोडव्याची
ARUN VASANT MARADE
Type: Print Book
Genre: Biographies & Memoirs, Comics & Graphic Novels
Language: Marathi
Price: ₹175 + shipping
This book ships within India only.
Price: ₹175 + shipping
Due to enhanced Covid-19 safety measures, the current processing time is 8-10 business days.
Shipping Time Extra

Description

ग्रामीण भागातील जीवन आणि तेथील वेग-वेगळे सन, उत्सव, परंपरा यांच्यातील समतोलावरील हि कथा आहे. या कथेचा सबंध हा माझ्या बालपणाशी आणि माझ्या कुटुंबातील गोष्टींशी मिळता जुळता आहे. माझ्या परिवारात केली जाणारी शेतातील ‘रास’ आणि त्यातून निर्माण झालेले बालप्रश्न, मी या लेखाच्या माध्यमातून जगासमोर आनत आहे. गावाच्या ठिकाणी अनेक अश्या काळानुरूप चालत आलेल्या रूढी परंपरा आजही आपल्याला पाहायला मिळतात. त्या गोष्ठी आपण पाहिल्यावर आपल्याला काहीतरी नवल असल्यासारखे वाटते. आपल्याला त्या आवडू लागतात. काही अश्या रूढी परंपरा असतात ज्या त्रासदायक असतात काही मनाला न पटणाऱ्या असतात. त्या परंपरा काळानुसार बदलत जातात. मात्र त्यातील उद्देश मात्र हा कधीच बदलत नाही. अश्याच एका परंपरेची गोष्ट घेऊन मी तुमच्यासमोर येत आहे. कुठल्याही गोष्टीचा बदल हा स्वताहून होत नसतो त्यासाठी भौतालची परीस्थिती हि कारणीभूत असते. तसेच वर्षानुवर्षे चालत आलेल्या रूढी परंपरा या सुध्दा भौतालच्या परीश्तिथीनुरूप बदलतात. याच बदलणाऱ्या परीस्थितीवर हि गोष्ट आधारित आहे. हि कथा एका ग्रामीण घराण्याची, मुलाची आणि त्या भोवतालच्या परिस्तिथीशी जोडले गेलेली आहे. तेथील रूढी परंपारा आणि दैनंदिन जीवन यांच्या आधारावर लिहीली गेली आहे. या कथेतील सर्व पात्र हे त्या कथेनुरूप तयार केलेले आहेत. वास्तवाशी या गोष्टीचा थोडाफार संबंध येऊ शकतो परंतु हि कथा कुठल्याही वास्तवाचे वर्णन करत नाही. हि कथा वाचत असताने तुम्ही गावाकडचे जीवन नक्की अनुभवाल याची मी खात्री देतो.

About the Author

जुन्नर तालुक्यातील सह्याद्रीच्या कुशीत आणि हरिश्चंद्र गडाच्या पायथ्याशी वसलेले कोल्हेवाडी गाव येथे सामान्य कुटुंबात माझा जन्म झाला. गावात फक्त इयत्ता सातवी पर्यंतचे शिक्षण दिले जात होते, पुढील शिक्षण शेजारीच असलेल्या खिरेश्वर गावा येथील शासकीय आश्रम शाळेत मी माझे दहावी पर्यंतचे मोफत शिक्षण पूर्ण केले. दहावी पर्यंतचे शिक्षण घेणे शासकीय आश्रमशाळेमुळे खूप सोपे झाले होते परंतु पुढील शिक्षण खर्चिक आणि बाहेरगावी असल्याकारणाने या परिसरातील बहुतेक तरुण तरुणी दहावी नंतर शिक्षणाला राम-राम देत असायचे. माझ्याबाबतीतही हेच होते की काय असा प्रश्न माझ्या मनात निर्माण झाला. मला समोर फक्त अंधार दिसत होता. कुठे तरी आशेचा किरण दिसावा म्हणून प्रयत्न करत होतो यातच माझा हात संपूर्ण जबाबदारीने माझ्या ताई आणि दाजी (जिजु) यांनी पकडला. मी पुढील शिक्षणासाठी ताईच्या सासरी येऊन राहू लागलो पुढे ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात मी वाणिज्य शाखेतून बँकिंग आणि विमा या शेत्रात पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. पुढील शिक्षणासाठी प्रयत्न केले पण ते निष्फळ झाले आणि हेच माझे शेवटेचे शिक्षण झाले. एकांतपणे निसर्गात फिरणे, विविध भाषेतील चित्रपट पाहणे, फक्त म्युझिक असलेली गाणी ऐकणे, पुस्तके वाचणे, एखादी गोष्ट पहिली की तिच्या विषयी मनोमनी गोष्ट तयार कारणे, यातच मी माझे आयुष्य जपत होतो. मनात खूप वर्ष साठून ठेवलेली ही गोष्ट कधीतरी लिहावी आणि जगाला दाखवावी वाटत होते आणि तोच हा योग. माझ्याबद्दल लिहिण्यासारखं जास्त काही नाहीये त्यामुळे मी इथेच थांबतो.

Book Details

ISBN: 9798654736413
Number of Pages: 55
Dimensions: 5.5"x8.5"
Interior Pages: B&W
Binding: Paperback (Perfect Binding)
Availability: In Stock (Print on Demand)

Ratings & Reviews

रास

रास

(Not Available)

Review This Book

Write your thoughts about this book.

Currently there are no reviews available for this book.

Be the first one to write a review for the book रास.

Other Books in Biographies & Memoirs, Comics & Graphic Novels

Shop with confidence

Safe and secured checkout, payments powered by Razorpay. Pay with Credit/Debit Cards, Net Banking, Wallets, UPI or via bank account transfer and Cheque/DD. Payment Option FAQs.