You can access the distribution details by navigating to My Print Books(POD) > Distribution
मी गेली २५ वर्षे मार्केटमध्ये व्यवहार करत असल्यामुळे शेअरमार्केट फार जवळून पाहिले, अनुभवले असल्यामुळे त्यातून बरेच काही शिकता आले. जसे मधमाशी प्रत्येक फुलातून मध गोळा करून त्यांचा संचय करते तेव्हाच त्याचे मधाचे पोळे तयार होते. हा मधाचा ठेवा अतिशय गोड रसाळ आणि औषधी असतो. असाच माझ्याजवळ सुद्धा अनेक चांगल्या, कसोटीच्या अनुभवांचा साठा तयार झाला. तेव्हा मला वाटले हा साठा तुमच्याबरोबर शेअर केल्यास मजा वाटेल, करमणुकीतून ज्ञान मिळेल, आणि शेअरमार्केटमधील व्यवहारांना दिशा मिळेल.
मी मार्केटमध्ये व्यवहार करत असताना अनेक तेजीमंदीच्या लाटांना सामोरी गेले. कधी लाटांच्या भोवऱ्यात अडकले, त्यातून सुटकाही झाली. या आठवणी चित्तथरारकही होत्या. पण मी वाट चोखाळत राहिले प्रयत्न करत राहिले. मार्केटमध्ये व्यवहार करणे सोडून द्यावे असे कधी वाटले नाही. मार्केटबरोबर माझे आयुष्यही समृद्ध होत गेले. रोज उगवणारा दिवस आणि मार्केटचा सहवास मला नवनवीन धडे देत राहिला. नाविन्याचा अनुभव मिळत गेला. रोज ‘जे नवे ते मला हवे’ अशी स्थिती झाली. शेअरमार्केट माझे मार्केट कधी झाले आणि मी मार्केटची कधी झाले ते या किस्स्यांतून आपणाला समजेल.
Currently there are no reviews available for this book.
Be the first one to write a review for the book Kisse Market che.