लिहिणाऱ्याला शब्दांचे सामर्थ्य ओळखावे लागते ते ओळखून त्याची योग्य ती मांडामांड करावी लागते. असे घडले की लेखन होते. हे जरी खरे असले तरी त्यात महत्वाचा ठरतो तो लेखकाचा मर्मज्ञानी,कल्पक दृष्टीकोन. प्रस्तुत लेखनात वाचकाला तो ठायीठायी दिसेल.वाचक हा नेहमी तृषार्त असतो. त्याला घोटभर पाण्यानेही समाधान लाभते. तो आनंद देण्याची किमया हे लेख साधतात.डॉ. सतीश श्रीवास्तव यांना ही किमया साधता आली याचे श्रेय त्यांच्या विचाक्षनातेला द्यावे लागेल. जगण्यातील फार बारीकसारीक जागा पकडून मिश्किलपणे आविष्कृत करण्यात डॉ.सतीश श्रीवास्तव यशस्वी झाले आहेत. या लेखकाच्या वाचनाने वाचकाच्या चेहऱ्यावर उमटणारी स्मितरेषा अंतर्मुखतेतून उगवून येईल हे मात्र नक्की.
-स्वानंद बेदरकर
Write a Review
To write a review, please login to your Pothi.com account.
लिहिणाऱ्याला शब्दांचे सामर्थ्य ओळखावे लागते ते ओळखून त्याची योग्य ती मांडामांड करावी लागते. असे घडले की लेखन होते. हे जरी खरे असले तरी त्यात महत्वाचा ठरतो तो लेखकाचा मर्मज्ञानी,कल्पक दृष्टीकोन. प्रस्तुत लेखनात वाचकाला तो ठायीठायी दिसेल.वाचक हा नेहमी तृषार्त असतो. त्याला घोटभर पाण्यानेही समाधान लाभते. तो आनंद देण्याची किमया हे लेख साधतात.डॉ. सतीश श्रीवास्तव यांना ही किमया साधता आली याचे श्रेय त्यांच्या विचाक्षनातेला द्यावे लागेल. जगण्यातील फार बारीकसारीक जागा पकडून मिश्किलपणे आविष्कृत करण्यात डॉ.सतीश श्रीवास्तव यशस्वी झाले आहेत. या लेखकाच्या वाचनाने वाचकाच्या चेहऱ्यावर उमटणारी स्मितरेषा अंतर्मुखतेतून उगवून येईल हे मात्र नक्की.
Re: Sukhi Manasacha T Shirt