You can access the distribution details by navigating to My pre-printed books > Distribution
ज्ञान प्रबोधिनीचे विस्तारकेंद्र बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे चालू करण्यासाठी तेथील स्थानिक तरूण कार्यकर्ता श्री. प्रसाद चिक्षे याने १९९९ मध्ये पुढाकार घेतला. अभियांत्रिकीचे पदव्युत्तर शिक्षण घेतानाच श्री. प्रसाद प्रबोधिनीच्या संपर्कात आला होता. तसेच श्री. आण्णा हजारे यांच्या आळंदी येथील पहिल्या उपोषणाचे वेळी त्याने प्रबोधिनीचे प्रतिनिधित्व केले होते. त्यानंतर कन्याकुमारीच्या विवेकानंद केंद्रात जीवनव्रती म्हणून प्रशिक्षण घेऊन नंतर अरुणाचल प्रदेशातील दुर्गम खेड्यांमधील केंद्राच्या शाळांचा समन्वयक म्हणून त्याने पाच वर्षे उत्तम काम केलेले होते.
स्वामी विवेकानंदांचे विचार तसेच हिंदुत्वातील तत्त्वविचारांचाही सखोल अभ्यास करणाऱ्या या कार्यकर्त्याने आपल्या जन्मगावी जेव्हा स्थायिक होऊन प्रबोधिनीचे संघटनात्मक कार्य वेगळ्या शैलीने सुरू करण्याचे ठरविले, तेव्हा प्रबोधिनीचे विद्यमान संचालक आदरणीय वाचस्पती गिरीशराव बापट यांनी आनंद व्यक्त केला. तेवढ्यावरच ते थांबले नाहीत, तर ठराविक अंतराने नियमितपणे ते अंबाजोगाईला जात राहिले आणि तेथील परिस्थितीचा अंदाज घेऊन तेथे कार्यकर्त्यांचा संच उभा करण्यास श्री. प्रसाद चिक्षे यास मार्गदर्शन करू लागले.
सुमारे १२ वर्षांच्या कालावधीत प्रबोधिनीचे अंबाजोगाई विस्तार केंद्र विविध अनौपचारिक उपक्रमांमधून कसे बहरत गेले, याचा आलेख...
Currently there are no reviews available for this book.
Be the first one to write a review for the book पत्र संवाद.