You can access the distribution details by navigating to My pre-printed books > Distribution

Add a Review

पत्र संवाद (eBook)

Type: e-book
Genre: Self-Improvement, Philosophy
Language: Marathi
Price: ₹0
Available Formats: PDF

Description

ज्ञान प्रबोधिनीचे विस्तारकेंद्र बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे चालू करण्यासाठी तेथील स्थानिक तरूण कार्यकर्ता श्री. प्रसाद चिक्षे याने १९९९ मध्ये पुढाकार घेतला. अभियांत्रिकीचे पदव्युत्तर शिक्षण घेतानाच श्री. प्रसाद प्रबोधिनीच्या संपर्कात आला होता. तसेच श्री. आण्णा हजारे यांच्या आळंदी येथील पहिल्या उपोषणाचे वेळी त्याने प्रबोधिनीचे प्रतिनिधित्व केले होते. त्यानंतर कन्याकुमारीच्या विवेकानंद केंद्रात जीवनव्रती म्हणून प्रशिक्षण घेऊन नंतर अरुणाचल प्रदेशातील दुर्गम खेड्यांमधील केंद्राच्या शाळांचा समन्वयक म्हणून त्याने पाच वर्षे उत्तम काम केलेले होते.
स्वामी विवेकानंदांचे विचार तसेच हिंदुत्वातील तत्त्वविचारांचाही सखोल अभ्यास करणाऱ्या या कार्यकर्त्याने आपल्या जन्मगावी जेव्हा स्थायिक होऊन प्रबोधिनीचे संघटनात्मक कार्य वेगळ्या शैलीने सुरू करण्याचे ठरविले, तेव्हा प्रबोधिनीचे विद्यमान संचालक आदरणीय वाचस्पती गिरीशराव बापट यांनी आनंद व्यक्त केला. तेवढ्यावरच ते थांबले नाहीत, तर ठराविक अंतराने नियमितपणे ते अंबाजोगाईला जात राहिले आणि तेथील परिस्थितीचा अंदाज घेऊन तेथे कार्यकर्त्यांचा संच उभा करण्यास श्री. प्रसाद चिक्षे यास मार्गदर्शन करू लागले.
सुमारे १२ वर्षांच्या कालावधीत प्रबोधिनीचे अंबाजोगाई विस्तार केंद्र विविध अनौपचारिक उपक्रमांमधून कसे बहरत गेले, याचा आलेख बघण्याजोगा आहे. मा. संचालकांनी श्री. प्रसाद व त्याचे सहकारी यांना वेळोवेळी लिहिलेली सविस्तर पत्रे यातून तो चढता कार्यालेख व्यक्त होतो. प्रबोधिनीच्या तात्त्विक भूमिका, अनेक प्रकारचे उपक्रम आणि त्यातून अपेक्षित असणारी मनुष्यघडण एखाद्या नव्या विस्तार केंद्रात कशी होत जाते, याचे मनोज्ञ दर्शन या पत्रसंवादातून घडते. कार्यकर्त्यांची विचारांची बैठक, बौद्धिक क्षमता, भावनांची उत्कटता व संघटन कौशल्य यांना वास्तवाचे परिमाण देण्यासाठी एकेका मुद्याचा बारकाव्याने उलगडा करीत मा. संचालकांनी जे दिशादर्शन या पत्रव्यवहारात केलेले आहे, त्यातून सर्वच कार्यकर्त्यांचे मोठेच प्रबोधन होत गेले. पुस्तकरूपाने प्रकाशित होणाऱ्या या संकलनातून सर्व वाचकांचेही ते होत राहील, यात शंका नाही. त्यामुळे या प्रकाशित पत्रांना 'प्रबोधनपत्रे' असे संबोधणे यथार्थ ठरेल.

About the Author

विद्या-वाचस्पती गिरीश श्रीकृष्ण बापट हे ज्ञान प्रबोधिनीचे संचालक म्हणून नोव्हेंबर १९८९ पासून काम करत आहेत. माध्यमिक शालेय शिक्षणापासून त्यांचा ज्ञान प्रबोधिनीशी संबंध आला. महाविद्यालयीन शिक्षणाच्या काळात त्यांनी प्रबोधिनीचा कार्यकर्ता सदस्य म्हणून काम केले. कॅनडामधून रसायन-शास्त्रातील वाचस्पती पदवी मिळाल्यानंतर १९८३ पासून ते ज्ञान प्रबोधिनीमध्ये स्वयंसेवी वृत्तीने काम करू लागले. प्रथम ज्ञान प्रबोधिनीचे कार्यवाह म्हणून व नंतर त्याच्या जोडीने ज्ञान प्रबोधिनी प्रशालेचे प्राचार्य म्हणून अनुभव घेतल्यानंतर त्यांनी संचालक पदाची जबाबदारी स्वीकारली. तत्पूर्वी कामासाठी आवश्यक म्हणून शिक्षण-शास्त्र व व्यवस्थापनशास्त्रातले पदव्युत्तर शिक्षण त्यांनी घेतले. शिक्षण, संशोधन, उद्योग, ग्रामविकसन, आरोग्य, आणि संघटन या क्षेत्रात ज्ञान प्रबोधिनीच्या विविध विभागांतर्फे आणि शाखा-संस्थांतर्फे चालणाऱ्या कामाचे संचालन करण्याचे उत्तरदायित्व त्यांच्याकडे आहे. अभ्यासदौरे, मदत-कार्य, प्रशिक्षण-शिबिरे, परिसंवाद अशा विविध निमित्तांनी ज्ञान प्रबोधिनीचे प्रतिनिधित्व करत त्यांनी देशात व परदेशात प्रवास केला आहे. विज्ञान आणि शिक्षणशास्त्र या विषयांमधील अभ्यास व प्रयोग ते करत असतात.

Book Details

Publisher: ज्ञान प्रबोधिनी,अंबाजोगाई
Number of Pages: 134
Availability: Available for Download (e-book)

Ratings & Reviews

पत्र संवाद

पत्र संवाद

(Not Available)

Review This Book

Write your thoughts about this book.

Currently there are no reviews available for this book.

Be the first one to write a review for the book पत्र संवाद.

Other Books in Self-Improvement, Philosophy

Shop with confidence

Safe and secured checkout, payments powered by Razorpay. Pay with Credit/Debit Cards, Net Banking, Wallets, UPI or via bank account transfer and Cheque/DD. Payment Option FAQs.